लाचखोर हवालदार एसीबीच्या ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2019 12:02 PM2019-08-13T12:02:52+5:302019-08-13T12:02:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : रिकाम्या प्लॉटवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी दिलेल्या तक्रारीवर तडजोड घडवण्यासाठी 25 हजाराची लाचेची मागणी करणा:या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : रिकाम्या प्लॉटवर केलेले अतिक्रमण काढण्यासाठी दिलेल्या तक्रारीवर तडजोड घडवण्यासाठी 25 हजाराची लाचेची मागणी करणा:या पोलीस कर्मचा:यास एसीबीच्या पथकाने सोमवारी ताब्यात घेतल़े तळोदा येथे ही कारवाई करण्यात आली़
तळोदा शहरातील उपजिल्हा रुग्णालयाला लागून असलेल्या पुरुषोत्तम नगरात तक्रारदाराचा प्लॉट होता़ याठिकाणी एका व्यक्तीने अतिक्रमण केले होत़े संबधित व्यक्ती अतिक्रमण न काढता प्लॉट मालकास धमकावत होता़ यातून त्यांनी 8 जून रोजी तळोदा पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती़ पोलीस निरीक्षक यांनी या तक्रारीचा निपटारा करण्याची जबाबदारी पोलीस कॉन्स्टेबल दशरथ राजाराम चव्हाण यास दिली होती़ दरम्यान हवालदार चव्हाण प्लॉट मालक आणि अतिक्रमित यांच्या समझोता घडवून आणला होता़ त्या मोबदल्यात त्यांनी 25 हजार रुपयांची मागणी केली होती़ यानंतर पोलीस कर्मचारी चव्हाण हा दरदिवशी तक्रारदार प्लॉट मालक याच्याकडे तगादा लावत होता़ तडजोडीअंती 20 हजार रुपयांची रक्कम ठरवण्यात आली होती़ प्लॉटमालकाने नंदुरबार येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबधित हवालदार चव्हाण याची तक्रार केली होती़ यातून सोमवारी तक्रारदार हे कॉन्स्टेबल चव्हाण यास लाच देण्यासाठी गेले असता, त्याने टाळाटाळ केली़ यावेळी विभागाच्या पथकाने त्यास ताब्यात घेत कारवाई केली़ याबाबत पोलीस हवालदार दशरथ चव्हाण याच्याविरोधात तळोदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आह़े पोलीस उपअधिक्षक शिरीष जाधव, पोलीस कॉन्स्टेबल उत्तम महाजन, संजय गुमाने, दिपक चित्ते, संदीप नावाडेकर, अमोल मराठे, मनोज अहिरे यांनी केली़