लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : तालुक्यातील आष्टे ते नंदुरबार दरम्यान चारचाकी-बसची समोरसमोर धडक होऊन कारचालक ठार झाला़ ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली़ नंदुरबार-आष्टे दरम्यान ओझर्दे फाटय़ाजवळ दुपारी तीन वाजेच्या सुमारास नंदुरबारकडून नाशिककडे जाणा:या एमएच 14 बीटी 2128 या बसने समोरून येणा:या एमएच 39 जे 1326 या कारला धडक दिली़ भरधाव वेगात दोन्ही वाहने एकमेकांवर आदळल्याने कारचालक ऋषीकेश रविंद्र जमदाडे रा़ खोंडामळी जागीच ठार झाला़ कारचालक जमदाडे हा गाडीमालक एऩडी़नांद्रे यांना छडवेल ता़ साक्री येथे सोडून नंदुरबारकडे येत होता़ घटनेची माहिती मिळाल्यानंतर आष्टे व नंदुरबार शहरातील काहींनी घटनास्थळाकडे धाव घेतली़ पोलीसांकडून ऊशिरार्पयत गुन्ह्याची नोंद करण्यात येत होती़बसमधील काही प्रवाशांना अपघातामुळे दुखापत झाल्याची माहिती आह़े पाऊस सुरू असल्याने हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आह़े अपघातामुळे मार्गावरील वाहतूक काहीवेळासाठी ठप्प झाली होती़
बस-चारचाकीची समोरासमोर धडक : आष्टे गावाजवळ घटना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 4:46 PM