ओसर्ली येथे एटीएम कार्ड बंद झाल्याचे सांगून फसवले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2018 01:25 PM2018-07-14T13:25:06+5:302018-07-14T13:25:06+5:30
नंदुरबार : मोबाईलद्वारे संपर्क करत एटीएम कार्ड बंद झाल्याचे सांगून अवघ्या काही मिनीटात 72 हजार रूपये ऑनलाईन पद्धतीने काढून घेत अज्ञात व्यक्तीने शेतक:याची फसवणूक केली़ ओसर्ली ता़ नंदुरबार येथे गुरूवारी सकाळी 8़30 वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला़
देविसिंह रामसिंग गिरासे असे फसवणूक झालेल्या शेतक:याचे नाव असून त्यांच्या खात्यातून समोरून फोन करणा:या अज्ञात व्यक्तीने 72 हजार 984 रूपये काढून घेतले आहेत़ गुरूवारी सकाळी देविसिंह गिरासे यांच्या घराशेजारी राहणारे दादूसिंह कृष्णासिंह गिरासे यांच्या मोबाईल क्रमांकावर अज्ञात व्यक्तीने संपर्क करत देविसिंह गिरासे यांची माहिती मागितली होती़ महत्त्वाचे असेल असे, समूजन दादूसिंह गिरासे यांनी देविसिंह यांच्या घरी जाऊन त्यांना फोन दिला़ यावेळी समोरून चौकशी करणा:या ‘ठगा’ने देविसिंह गिरासे यांच्याकडून त्यांच्या मुलाच्या बँक खात्यात अडचणी असून एटीएम बंद झाल्याचे सांगितल़े घाबरलेल्या देविसिंह यांनी तात्काळ संबधित व्यक्तीने मागितलेले एटीएम आणि ओटीपी दिला़
दोन्ही क्रमांक दिल्याच्या काही मिनीटातच त्यांच्या खात्यातून 72 हजार रूपयांची रक्कम वजा झाल्याचे समजून आल़े खात्यातून 72 हजार 984 रूपये ऑनलाईन पद्धतीने वजा झाल्याने गिरासे यांना धक्का बसला़ त्यांनी सायंकाळी नंदुरबार तालुका पोलीस ठाणे गाठून दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आह़े घटनेची परिसरात एकच चर्चा सुरू होती़ गिरासे यांच्या मुलाच्या खात्यातून पैसे दुस:या खात्यात वर्ग करण्यापूर्वी संबधित ‘ठगा’ने गिरासे यांच्या मोबाईलवरून ओटीपी क्रमांक मेसेजद्वारे मागितले होत़े ओटीपी दिल्यानंतर ऑनलाईन ट्रान्ज्ॉक्शनद्वारे पैसे कपात झाल़े ग्रामीण भागातही ऑनलाईन फसवणूक घडल्याने एकच खळबळ उडाली आह़े शासकीय स्तरावरून फसवणूकीचे प्रकार बंद होण्यासाठी व्यापक जागृती करूनही घटना घडत आहेत़ ग्रामीण भागातील नागरिकांना हेरून फसवणूक करणारे अनेक प्रकारच्या भूलथापा देत असल्या कारवाया करत असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आह़े