नववर्षाच्या प्रारंभीच मिरचीला दरवाढीचा तडका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 12:06 PM2020-01-05T12:06:17+5:302020-01-05T12:06:24+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : नवीन वर्षात मिरची उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी सुरु झाली असून ओली लाल मिरची प्रतिक्विंटल चार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : नवीन वर्षात मिरची उत्पादक शेतकऱ्यांची दिवाळी सुरु झाली असून ओली लाल मिरची प्रतिक्विंटल चार हजार रुपये दराने खरेदी होत आहे़ परराज्यातून येणारी मिरची आवक बंद झाल्याने स्थानिक शेतकऱ्यांच्या मिरचीला दुप्पट भाव मिळू लागल्याने शेतकरी आनंदित झाले आहेत़
यंदा सुरु झालेल्या हंगामाच्या प्रारंभी व्यापाºयांकडून मिरचीला साधारण तीन हजार रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल दर देण्यात येत होते़ अवकाळी पाऊस, खराब हवामान यावर मात करुन संगोपन केलेल्या मिरचीला दिलेले दरही पुरेसे असल्याने शेतकºयांकडून नोव्हेंबरच्या अंतिम आठवड्यात १६ हजार क्विंटल मिरची आवक सुरु झाली होती़ डिसेंबर महिना मिरची हंगामातील सर्वात महत्त्वपूर्ण महिना मानला जातो़ परराज्यातून येणाºया मिरचीमुळे बाजारातील व्यापाºयांची उलाढाल वाढते़ यातून स्थानिक मिरचीची दर पडून मालाही आवकही कमी होते़ परंतू यंदाच्या हंगामात येथील मिरची व्यापाºयांकडे आंध्रप्रदेश व गुजरात राज्यातून येणारी मिरची थांबली आहे़ खासकरुन आंध्रप्रदेशातून येणारी मिरची आलेली नसल्याने व्यापाºयांनी येथील शेतकºयांच्या मिरचीला दुप्पट दर देत खरेदी सुरु ठेवली आहे़ ही स्थिती महिनाभर कायम राहिल्यास मिरची उत्पादकांचे गेल्या दोन वर्षात झालेले नुकसान भरुन येण्यास मदत मिळणार आहे़
हंगामात शेतकºयांनी लाली, व्हीनआर या मिरची वाणांना पसंती दिली होती़ यातील लाली आणि व्हीएनआरची सध्या बाजारात चलती आहे़ ओल्या मिरचीला दुप्पट भाव असताना कोरडी मिरचीही चढ्या दरांनी खरेदी होत आहे़ व्यापाºयांकडून सात ते १२ हजार रुपये प्रतिक्विंटल दराने कोरडी मिरची खरेदी होत आहे़
बाजारात गेल्या महिन्यात ओली मिरची २ हजार २०० ते २ हजार ८०० रुपये प्रती क्विंटल दराने खरेदी करण्यात येत होती़ यातून बाजारात आतापर्यंत ३५ हजार क्विंटल मिरची आवक पूर्ण झाली आहे़ डिसेंबर महिन्यात आंध्रप्रदेशातील गुंटूर येथून मिरची नंदुरबारात विक्रीसाठी आणली जाते़ या मिरचीमुळे स्थानिक मिरचीचे दर खाली येऊन खरेदीवरही परिणाम होत होता़ परंतू यंदा गुंटूरची मिरची दाखल झालेली नसल्याने स्थानिक शेतकºयांना त्याचा थेट लाभ झाला आहे़