‘प्रभारीराज’मुळे नागरिकांची फिरफिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 10:56 AM2017-09-18T10:56:47+5:302017-09-18T10:56:47+5:30
तळोदा विभागात अधिकारी मिळेना : नियमित प्रांताधिकारी व प्रकल्पधिका:यांची प्रतिक्षा
वसंत मराठे।
लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : शहरातील प्रांत कार्यालय अन आदिवासी प्रकल्प कार्यालय या दोन्ही प्रमुख कार्यालयात भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिका:यांची नेमणूक केली असली तरी ते प्रभारी आहेत़ ते पूर्णवेळ कार्यालयात राहू शकत नसल्याने जनतेची फिरफिर वाढल्याचे चित्र आह़े येत्या काळात विभागातील ग्रामपंचायत व पुढील पालिका निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर कायम अधिकारी नियुक्तीची मागणी आह़े
दोन महत्त्वपूर्ण अधिकारी पूर्णवेळ नसल्याच्या या प्रकाराची दखल महसूल विभागाने घेण्याची गरज आह़े आदिवासी जनतेच्या विकासासाठी व शासनाच्या महसूली सोईसाठी शहरात उपविभागीय अन् आदिवासी विकास प्रकल्प अशी प्रमुख कार्यालय सुरु आहेत़ यात तळोद्यासह अक्कलुकुवा व धडगाव या सातपुडय़ातील अति दुर्गम तालुक्यांच्या समावेश आह़े मात्र गेल्या सहा महिन्यांपासून हे दोन्ही प्रमुख विभाग प्रभारी अधिका:यांवर सुरु असल्याने कामासाठी येण:या नागरिकांची फिरफिर वाढली आह़े
तत्कालीन प्रांताधिकारी अभिजीत राऊत यांची एप्रिल महिन्यात बदली झाल्यानंतर आजही कायम अधिकारी नियुक्त करण्यात आलेला नाही़ त्यांच्याजागी बदलून आलेले अमोल कांबळे हे एक आठवडाही आले नाहीत़ रजेवर असतानाच त्यांना सातारा जिल्ह्यात रोहयो अपहार प्रकरणी अटक करण्यात आली आह़े प्रशासनाने येथे उपजिल्हाधिकारी डॉ अजित थोरबोले यांची नियुक्ति केली आहे मात्र ते नियमित कार्यालयात राहत नाहीत़ आठवडय़ात तिन दिवस उपस्थित असतात़ जातीचे दाखले व इतर तत्सम कागद पत्रांसाठी नागरिकांना हेलपाटे मारवे लागत आहे यात पैसा व वेळ वाया जात आहेच, तरीही काम होत नसल्याने रिकामे हाताने परत जावे लागत असल्याची व्यथा आह़े शिवाय आज साहेब नाहीत उद्या येतील, असे सबंधितंकडून सांगितले जात असल्याने निराशाच पदरी पडत़े वास्तविक तळोदा व अक्कलकुवा तालुक्यात ग्रामपंचयत निवडणुका लागल्या आहेत तसेच पुढे तळोदा नगरपालिकेचीही निवडणूक होणार आह़े
साहजिकच या पाश्र्वभूमीवर इच्छुक उमेदवारांची जातीचे दाखले, पडताळणीकरीता लागणारी कागदपत्रे या करिता वर्दळ वाढली आह़े अर्थात प्रांताधिकारी साहेबांना निरोप दिल्या नंतर ते तात्काळ येतात मात्र तेथील कामाच्या व्यापामुळे ते पूर्णवेळ येथे देवू शकत नाही महसूली कामकाजाच्या दृष्टीने पूर्ण वेळ अधिकारी कार्यालयीन स्थळी असणे आवश्यक आह़े त्यातही प्रांत कार्यालय प्रशस्त मध्यवर्ती इमारतीत आह़े शिवाय इतर डझनभर विभाग याच इमारतीत आहेत़ त्यामुळे इतर कर्मचार्यांवर वचक राहत असतो मात्र हा अधिकारी कायम स्वरूपी नसल्यामुळे कर्मचारींचे ही चांगलेच फावले असल्याचे म्हटले जात आह़े
दोन्ही पदांवर नियमित अधिकारी नियुक्त करण्याबाबत महसूल विभागाने गांभिर्याने दखल घेण्याची अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आह़े