पुढील आठवडय़ापर्यत थंडीची लाट कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 07:13 PM2019-01-11T19:13:03+5:302019-01-11T19:15:19+5:30

उत्तर महाराष्ट्र : तोरणमाळ 5 अंशावर

The cold wave continued for next week | पुढील आठवडय़ापर्यत थंडीची लाट कायम

पुढील आठवडय़ापर्यत थंडीची लाट कायम

googlenewsNext

नंदुरबार : उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यात पुढील आठवडय़ार्पयत थंडीचा जोर कायम राहणार आह़े त्यातच 15 व 16 जानेवारी हे दोन दिवसात उत्तर महाराष्ट्रात तसेच विदर्भात किमान तापमानात मोठी घट होणार आह़े
उत्तरेकडून येत असलेल्या शितलहरींच्या प्रभावानुसार उत्तर महाराष्ट्रात पुढील आठवडाभर थंडीत चढउतार बघायला मिळणार आहेत़ जेष्ठ हवामान तज्ज्ञ डॉ़ रामचंद्र साबळे यांनी सांगितल्यानुसार 21 जानेवारीपासून थंडी हळुहळु ओसरण्यास सुरुवात होणार आह़े सध्या उत्तरेकडून दक्षिणेकडे वारे वाहत आहेत़ त्यामुळे पुढील आठवडा थंडीची लाट कायम राहणार आह़े त्यानंतर या स्थितीत बदल होऊन नैऋृत्येकडून दक्षिणेकडे वारे वाहण्यास सुरुवात होणार आह़े यामुळे थंडीचा जोर काही प्रमाणात ओसरण्यास सुरुवात होणार आह़े पुणे ‘आयएमडी’तर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार विदर्भ व मध्य महाराष्ट्रात अंशत: कोरडे वातावरण राहणार आह़े त्यामुळे या ठिकाणी थंडीत मोठी वाढ होण्याची शक्यता निर्माण होईल़ तर उर्वरीत महाराष्ट्रातही सरासरीपेक्षा 2 ते 3 टक्के जास्त थंडी कायम राहणार आह़े 
शहादा 7 अंशावर स्थिर
नंदुरबारात शुक्रवारी 12.3 अंश किमान तापमानाची नोंद करण्यात आली़ तर नवापूर व शहादा येथे अनुक्रमे 8 व 7 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान होत़े तोरणमाळ येथे 5.2 इतके नीच्चांकी किमान तापमान नोंदविण्यात आल़े नंदुरबरातील ग्रामीण भागात थंडीने कहर केला असून सकाळी परिसरात दाट धुके पसरलेले असत़े अक्कलकुवा तालुक्यातील डाब परिसरात मोठय़ा प्रमाणात दवबिंदू दिसून येत आहेत़ वातावरण ब:यापैकी कोरडे राहत असल्याने थंडीचा कडाका अधिक जाणवत आह़े 

Web Title: The cold wave continued for next week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.