वीज जोडणी नसताना शेतकऱ्याला कंपनीने पाठवले ६८ हजाराचे बिल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 12:53 PM2020-09-28T12:53:31+5:302020-09-28T12:53:38+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विसरवाडी : नवापुर तालुक्यातील दापूर येथील शेतकºयाच्या शेतातील विहिरीवर विद्युत मोटार पंप साठी विद्युत जोडणी नसताना ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विसरवाडी : नवापुर तालुक्यातील दापूर येथील शेतकºयाच्या शेतातील विहिरीवर विद्युत मोटार पंप साठी विद्युत जोडणी नसताना देखील वीज महावितरण कंपनीद्वारे ६८ हजार ९६० रुपये वीज बिल देण्यात आले आहे़ जोडणी नसतानाही आलेले बिल पाहून शेतकरी चक्रावून गेला आहे़ विशेष बाब म्हणजे शेतकºयाने कनेक्शनसाठी आठ वर्षांपूर्वी अर्ज दिला होता़ या अर्जानुसार कनेक्शन न देताच थेट बिल दिल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे़
या प्रकाराकडे लक्ष वेधत शेतकºयाने कंपनीच्या उपअभियंत्यांना निवेदन देत चौकशीची मागणी केली आहे़ दापूर येथील रेक्या नेंडाडा गावीत असे शेतकºयाचे नाव असून त्यांची दापूर शिवारात शेतजमीन आहे़ शेतातील विहिरीवर सिंचनासाठी तीन एचपी विद्युत मोटार पंप बसवण्यासाठी त्यांनी १५ मार्च २०१२ रोजी अर्थात आठ वर्षांपूर्वी वीज कनेक्शनसाठी अर्ज दाखल केला होता़ यासाठी ५ हजार ७०० रूपयांची अनामत रक्कमही कंपनीकडे जमा केली होती़ आठ वर्ष उलटूनही कंपनीने शेतकºयाला कनेक्शन दिलेले नाही़ शेतात वीज पुरवठा करणारा वीज खांब व तारा देखील टाकण्यात आलेल्या नाहीत़ असे असतानाही वीज वितरण कंपनीकडून ३१ आॅगस्ट रोजी रेक्या गावीत यांना ६८ हजार ९६० रूपयांचे वीज बिल कंपनीकडून देण्यात आले आहे़ हे बिल २०१३ पासून व्याजासह पाठवण्यात आले आहे़ शेतात पंपच नसताना वीज बिल देण्यात आल्याने शेतकºयाने नाराजी व्यक्त करत कंपनीच्या अधिकाºयांकडे धाव घेतली आहे़ निवेदनाद्वारे गावीत यांनी आलेले बिल रद्द करुन तातडीने वीज जोडणी द्यावी अशी मागणी केली आहे़
याप्रकारामुळे नवापूर तालुक्यात शेतकºयांनी नाराजी व्यक्त करत कंपनीच्या अधिकाºयांना विचारणा केली होती़ तालुक्यातील बºयाच शेतकºयांनी कृषीपंपासाठी कनेक्शन मिळावे म्हणून कंपनीकडे अर्ज केले आहेत़ परंतु कंपनीकडून या अर्जांवर कारवाई होण्यास दिरंगाई केली जात असल्याचे शेतकºयांचे म्हणणे आहे़