लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासनाने खरीप पिकांसाठी करण्यात येणा:या विमा योजनेस दोन दिवस मुदतवाढ देऊनही शेतक:यांनी प्रतिसादच दिलेला नसल्याची माहिती समोर आली आह़े विम्याची मुदत जाऊन दोन दिवस उलटले असले तरी बँका अंतिम आकडेवारीची जुळवाजुळव करत असल्याने पुन्हा एकदा विमा योजनेतील सावळ गोंधळ समोर आला आह़े प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत खरीप हंगामात पेरणी होणा:या पिकांना हवामानाधारित विमा योजना राबवण्यात येत़े नैसर्गिक आपत्तीपासून पिकांचे संरक्षण व्हावे म्हणून राबवल्या जाणा:या या योजनेत गत पाच वर्षात भरपाईबाबत शेतकरी उपेक्षित राहिल्याने त्यांचा सहभाग कमी झाला होता़ जिल्ह्यात 2017 च्या खरीप हंगामात 12 हजार 635 शेतक:यांनी 24 कोटी रुपयांचा भरणा करत पीकविमा करून घेतला होता़ दुष्काळ जाहिर झाल्यानंतर शेतक:यांना भरपाई मिळणार अशी अपेक्षा असताना 2018 मध्ये केवळ 814 शेतक:यांना भरपाई देण्यात आली़ दरम्यान 2018 या वर्षात 9 हजार 314 कजर्दार तर 917 बिगर कजर्दार शेतक:यांनी पीक विमा करुन घेतला होता़ यातील केवळ दोन हजार शेतक:यांना भरपाई वाटप करण्यात आल्याने शेतक:यांनी विम्याकडे पूर्णपणे पाठ फिरवल्याचे समोर येत असलेल्या आकडेवारीवरुन दिसून येत आह़े विशेष म्हणजे जिल्ह्यात यंदा पावसाला उशिरा सुरुवात होऊनही 2 लाख 60 हजार हेक्टरवर पेरण्या पूर्ण करण्यात आल्या आहेत़ यातील केवळ सात हजार क्षेत्र विम्याखाली येत असल्याने उर्वरित क्षेत्रातील शेतक:यांचे काय असा, प्रश्न आह़े गेल्या वर्षात शेतकरी दुष्काळाच्या कक्षेत येऊनही पिक विमा न मिळाल्याने यंदा शेतक:यांनी विम्यात पैसे घालवण्यापेक्षा बियाण्याला द्यावे असा पवित्रा घेतल्याने ही स्थिती निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आह़े पिकविम्यासाठी सर्वात महत्त्वपूर्ण घटक असलेल्या बँकांकडून 12 हजार 81 शेतक:यांना गेल्या आठवडय़ार्पयत कर्ज वाटप करण्यात आले आह़े जिल्हा बँकेने 45 कोटी तर राष्ट्रीयकृत बँेकांनी 9 कोटी रुपयांचे कर्ज शेतक:यांना वाटप केले होत़े यातून विमाधारक शेतक:यांची संख्या वाढण्याची अपेक्षा असतानाही निवडक शेतक:यांनी विमा घेतल्याने जिल्ह्यातील प्रत्यक्ष विम्याखालचे क्षेत्र हे खालावल्याचे दिसून येत आह़े शनिवारी दुपार्पयत संपूर्ण आकडेवारी प्राप्त होणार असल्याचे सांगण्यात येत असले तरी त्यात 1 हजार शेतक:यांची संख्या वाढ होणार असल्याचे खात्रीशीरपणे सांगण्यात येत आह़े यामुळे पिकविमाधारकांची संख्या ही 10 हजाराच्या आतच राहिल अशी शक्यता वर्तवण्यात येत आह़े यात बिगर कजर्दार शेतक:यांची संख्याही यंदा घटल्याची माहिती देण्यात येत आह़े
2019-20 या वर्षात 30 जूनर्पयत 2 हजार 694 कजर्दार तर 3 हजार 784 बिगर कजर्दार शेतक:यांनी पिकविमा करवून घेतला आह़े एकूण 6 हजार 482 शेतक:यांनी 1 कोटी 19 लाख 80 हजार 328 रुपयांचा भरणा केला होता़ यातून केवळ 7 हजार 46़46 हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले आह़े यात दोन दिवसांची मुदतवाढ मिळाल्याने वाढ होण्याची अपेक्षा असली तरी नी नगण्य असल्याचा दावा केला जात आह़े 2016 या वर्षात 27 हजार 160 कजर्दार तर 12 हजार 99 बिगर कजर्दार शेतक:यांनी पिक विमा केला होता़ यातून 3 लाख 8 हजार हेक्टर क्षेत्र संरक्षित झाले होत़े 26 कोटी 69 लाख 68 हजार रुपयांचा भरणा झाला होता़ यातून केवळ 7 हजार 505 शेतक:यांना 10 कोटी 3 हजार 94 रुपयांची भरपाई देण्यात आली होती़ 2016 साली काहीअंशी अतीवृष्टी आणि दुष्काळ असा दुहेरी संगम काही तालुक्यांमध्ये होता़ उत्पादन न आल्याने शेतक:यांना भरपाईची अपेक्षा होती़ परंतू अपेक्षित भरपाई न मिळाल्याने 2017 मध्ये 10 हजार 169 कजर्दार व 2 हजार 466 बिगर कजर्दार शेतक:यांनी पिकविम्यात सहभाग घेतला़ यातील केवळ 814 शेतक:यांनाच भरपाई मिळाल्याने 2018 मध्ये 10 हजार 231 शेतकरी तयार झाल़े यातील बहुतांश शेतकरी भरपाईच्या प्रतिक्षेत आहेत़