आदिवासी विकास विभागाच्या निविदेबाबत तक्रार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:36 AM2021-09-14T04:36:20+5:302021-09-14T04:36:20+5:30
रजिस्ट्रेशनसाठी कागदपत्रांची पूर्तता केलेल्या लोकांना रजिस्ट्रेशन द्यावे, दोन दिवसापूर्वी रजिस्ट्रेशन असलेल्या ठेकेदारांना बोलावून त्यांच्याकडून संबंधित विभागाने त्यांची कागदपत्रे जमा ...
रजिस्ट्रेशनसाठी कागदपत्रांची पूर्तता केलेल्या लोकांना रजिस्ट्रेशन द्यावे, दोन दिवसापूर्वी रजिस्ट्रेशन असलेल्या ठेकेदारांना बोलावून त्यांच्याकडून संबंधित विभागाने त्यांची कागदपत्रे जमा करून घेतले आहेत. त्यांना कागदपत्रे परत करावीत, निवेदन भरण्याची मुभा द्यावी. संबंधित विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्याशी संपर्क साधला असता त्यांचा संपर्क होत नाही. त्यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे मेसेज टाकून व त्यांचा प्रतिसाद देत नाहीत, संबंधित विभागाचे मंत्र्यांचे स्वीय सहायक वाघ यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी कुठलाही प्रतिसाद दिलेला नाही. संबंधित विभागाने आपल्या मर्जीतल्या ठेकेदारांना काम देण्यासाठी आपली मनमानी कारभार सुरू केला आहे. दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील ठेकेदारांना बोलवून त्यांच्याकडील कागदपत्र डिजिटल सिग्नेचर सर्व एका पेनड्रॅाईव्हमध्ये जमा केले आहे ते परत करावे, उद्याच निर्णय झाला नाही तर आपण याबाबत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस व प्रवीण दरेकर यांच्याकडे तक्रार करून हा विषय विधानसभेत लावून धरू, असा इशारा दिला आहे.