नंदुरबार : राज्य शासनाच्या मेगा भरतीच्या पाश्र्वभुमीवर जिल्ह्यातील विविध विभागातील रिक्त जागांचा आढावा घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. शनिवार व रविवारी सुटीच्या दिवशी देखील अनेक विभागाचे कर्मचारी कार्यालयांमध्ये हजर होते. दरम्यान, याबाबत जिल्हा परिषदेने आघाडी घेत विविध विभागांच्या रिक्त जागांचा तपशील शासनाला कळविल आहे. जिल्हा परिषदेत एकुण 331 जागा भरण्याचा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.राज्य शासनाच्या मेगा भरतीची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. विशेषत: बेरोजगार युवकांमध्ये याबाबत विशेष उत्सूकता दिसून येत आहे. तब्बल 72 हजार जागा भरल्या जाणार असल्यामुळे अनेक बेरोजगार युवकांना आस लागून आहे. एकीकडे बेरोजगार युवकांची उत्सूकता वाढली आहे तर दुसरीकडे शासकीय स्तरावर याबाबतच्या प्रक्रियेसाठी हालचाली गतीमान झाल्या आहेत. याबाबत गेल्या आठवडय़ात सर्व विभागांना रिक्त जागांच्या तपशीलाबाबत कळविण्याचे आदेश संबधित विभागांनी दिले होते. त्यामुळे शनिवार व रविवारी देखील कार्यालयांमध्ये अनेक कर्मचारी दिसून आले होते.विगतवारीचे काम सुरूनंदुरबार जिल्ह्यात सर्व विभागांकडून मंजुर पदे, रिक्त पदे यांची विगतवारी करण्याचे काम सुरू आहे. जिल्ह्यात सर्व विभाग मिळून जवळपास आठशे पेक्षा अधीक जागा रिक्त असल्याचा अंदाज आहे. एकटय़ा जिल्हा परिषदेत तीनशेपेक्षा अधीक पदे रिक्त आहेत. याशिवाय महसूलची देखील अनेक पदे रिक्त आहेत. सर्व विभागांची विगतवारीचे काम अंतिम टप्प्यात आहे. जिल्हा परिषदेत 331 पदे जिल्हा परिषदेत एकुण 331 पदे रिक्त असल्याचा अहवाल शासनाकडे पाठविण्यात आला आहे. त्यात प्रयोगशाळा तंत्रज्ञाची आठ, आरोग्य सेवकाची 44, एएनएमची 191 पदे, कनिष्ठ अभियंत्यांची 12 पदे, सहायक कनिष्ठ अभियंत्यांची 31 पदे, कनिष्ठ यांत्रिकीची एक, ज्येष्ठ यांत्रिकी दोन, सुपरवायझर 29, एलएसएस सहा याशिवाय विविध विभागांचे चार प्रमुख पदे असे एकुण 331 पदे रिक्त असल्याचे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे. तलाठीच्या 33 जागाजिल्ह्यात तलाठीच्या 33 जागा रिक्त आहेत. महसूल विभागातर्फे या जागा भरण्यासाठीचा प्रस्ताव देखील पाठविण्यात आला आहे. त्यामुळे तलाठीपदाची देखील एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर भरती होणार आहे.पेसा कायद्यान्वये भरती?शासनातर्फे होणारी भरती ही थेट भरतीअंतर्गत होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात पेसा कायद्याअंतर्गत ही भरती होते किंवा कसे याकडे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्या लक्षात घेता पेसा कायदा लागू आहे. त्यामुळे स्थानिक आणि आदिवासी उमेदवारांनाच भरतीत प्राधान्य राहणार असल्याचे कायद्यात नमुद आहे. त्यामुळे या भरतीला पेसाचा नियम लागू होतो किंवा कसे याबाबतही अद्याप स्पष्ट झालेले नाही.क्लासचे फुटतेय पेवभरती ही स्पर्धा परीक्षेद्वारे होणार आहे. त्यामुळे येत्या काळात विविध क्लासेसचे पेव फुटणार आहे. काहींनी आतापासूनच त्यासाठी तयारी सुरू केली आहे. स्पर्धा परीक्षा, स्थानिक माहिती, चालू घडामोडी यांची माहिती घेण्यासाठी, मिळविण्यासाठी सध्या बेरोजगार युवकांमध्ये धडपड सुरू आहे. शासकीय नोकरीत भरतीची ही मोठी संधी असल्यामुळे व यापुढे एव्हढी मोठी भरती कधी आणि कशी होईल, तोर्पयत वयोमर्यादा ओलांडली जाणार आहे. अर्थात एजबार होणार असल्यामुळे युवकांचा जास्तीत जास्त प्रय} या भरतीसाठी राहणार आहे.
रिक्त पदांच्या विगतवारीचे काम पूर्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:21 AM