भारत बंदला नंदुरबारात संमिश्र प्रतिसाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:18 PM2018-01-25T12:18:40+5:302018-01-25T12:18:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गुरुवारच्या भारत बंदला नंदुरबारात संमिश्र प्रतिसाद मिळाला़ बहुचर्चित ‘पद्मावत’ चित्रपटाविरोधात करणी सेना व राजपूत सेनेकडून नंदुरबार शहरात पायी रॅली काढून व्यापारांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन करण्यात येत होत़े
जिल्ह्यातील शहादा, तळोदा, नवापूर, अक्कलकुवा तालुक्यांमध्येही बंदला संमिश्र प्रतिसाद दिसून आला़ शहादा व अक्कलकुवा येथे बहुतेक व्यापा:यांनी आपली दुकाने उघडलेली होती़ काही व्यापा:यांनी स्वताहून बंदला पाठींबा दिल्याचेही दिसून आल़े नंदुरबार शहरात सराफ बाजारात मात्र शुकशुकाट दिसून आला़ करणी संघटना व राजपूत सेनेकडून नंदुरबार शहरातील मुख्य मार्गावर उभे राहून ‘पद्मावत’ चित्रपटाविरोधात व निर्माते संजय लीला भन्साली यांच्या विरोधात आक्रमकपणे घोषणाबाजी देण्यात येत होती़ सावधगिरीचा उपाय म्हणून पोलीस प्रशासनाकडून नंदुरबारातील चौका-चौकात पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनाद करण्यात आले होत़े