लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोठली, ता.नंदुरबार येथील शासकीय आश्रमशाळेत स्थानिक ठिकाणीच पिकविलेला सेंद्रीय भाज्या विद्याथ्र्याना दैनंदिन आहारात पुरविल्या जात आहेत. वांगे, टमाटे, मेथी, दुधी आदी भाज्यांचे या ठिकाणी उत्पादन घेतले जात आहे. ‘किचन गार्डन’ची कोठली आश्रमशाळेतील संकल्पना यशस्वी ठरली आहे. कोठली आश्रम शाळेत बारावीर्पयतचे वर्ग आहेत. याच आश्रम शाळेने राज्यातील पहिली आयएसओ मानांकन असणारी आदिवासी आश्रमशाळेचा मान देखील मिळविलेला आहे. शाळेतील विविध उपक्रम आदर्शवत आहेत. जिल्हाधिका:यांनी ही शाळा दोन वर्षापूर्वी दत्तक देखील घेतली होती. त्यांच्याच संकल्पनेतून त्यावेळी किचन गार्डन अस्तित्वात आले होते.आश्रम शाळेच्या या गार्डनमधून आता विविध भाजीपाला निघू लागला आहे. आश्रम शाळेचा विस्तीर्ण परिसराचा उपयोग या किचन गार्डनसाठी करण्यात आला आहे. सध्या येथून वांगे, टमाटे मोठय़ा प्रमाणावर निघत आहेत. मेथीचे देखील उत्पादन येथून घेण्यात आले होते. दुधीभोपळा आणि इतर वेलवर्गीय भाजीपालाही घेतला जातो. साधारणत: 15 गुंठे क्षेत्रात वांगे, दहा गुंठे क्षेत्रात टमाटे, 10 गुंठय़ांमध्ये मेथी तर इतर भाजीपाला तीन गुंठय़ात घेण्यात आला. भाजीपाल्यासाठी कुठलेही रासायनिक खते किंवा किटकनाशकांचा वापर केला जात नाही. नैसर्गिकरित्या आणि सेंद्रीय पद्धतीने हा भाजीपाला पिकवला जातो. आश्रम शाळेत असलेल्या कुपनलिकेच्या माध्यमातून त्याला पाणी पुरविले जाते. विद्यार्थीनींच्या दैनंदिन आहारात या पालेभाज्यांचा उपयोग केला जातो. स्थानिक ठिकाणीच पिकविलेल्या भाजीपाल्यातून सकस आहार विद्यार्थीनींना मिळत असल्यामुळे विद्यार्थीनींसह पालकांनी देखील समाधान व्यक्त केले आहे.प्रकल्प अधिकारी वान्मती सी. यांनी देखील या उपक्रमाचे वेळोवेळी कौतूक केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्याध्यापक बी.आर.मोरे, प्रा.ए.जे.पाडवी, प्रा.पी.आर.पाटील, प्रा.एस.पी.भाले, प्रा.डी.एम.पाटील, प्रा. एम.एल.कर्णकार, प्रा.ए.बी.भदाणे, भानुदास पाटील हे त्यासाठी वेळोवेळी परिश्रम घेत आहेत. गावाचे सरपंच यांनीदेखील यासाठी मोलाची मदत केल्याचे सांगण्यात आले.येथील आश्रम शाळेत जिल्हाभरातील विविध भागातील आदिवासी विद्यार्थीनी शिकण्यासाठी आहेत. त्यांना सकस आहार मिळावा यासाठी आश्रमशाळा व्यवस्थापनाचा नेहमीच प्रय} असतो.त्याअंतर्गतच आवारात किचन गार्डनचा उपक्रम राबविण्यात आला. तो उपक्रम शाळा व्यवस्थापनाने उत्कृष्टरित्या यशस्वी केला आहे. परिणामी या ठिकाणी विविध भाजीपाला पिकू लागला आहे.येत्या काळात किचन गार्डन आणखी व्यापक स्वरूपात करण्याचे नियोजन प्रकल्प अधिका:यांच्या मार्गदर्शनाखाली आश्रमशाळा व्यवस्थापनाने केले आहे.
कोठली आश्रमशाळेत किचन गार्डनची संकल्पना यशस्वी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:49 PM