शहरं
Join us  
Trending Stories
1
"2019 मध्ये यांच्यासाठी जो 'चौकीदार' चोर होता, तो आता 'ईमानदार' झाला..."; असं का म्हणाले पीएम मोदी?
2
EVM ऐवजी बॅलेट पेपरवर निवडणुका व्हाव्यात, काँग्रेसच्या बैठकीत प्रियंका गांधींची मागणी
3
Mumbai Indians फिरवली पाठ, Ishan Kishan ने ठोकले ९ षटकार, अवघ्या २७ चेंडूत जिंकवली मॅच
4
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
5
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
6
IPL Auction 2025: Rishabh Pant वर लागली २७ कोटींची तगडी बोली, टॅक्स कापून हातात किती मिळणार?
7
चंपाई सोरेन यांची JMM मध्ये घरवापसी होणार? 'कोल्हन टायगर'ला हेमंत सोरेन यांची ऑफर..?
8
टीम इंडियाने लाँच केली नवी जर्सी, झाला महत्त्वाचा बदल; पहिल्यांदा कधी मैदानात कधी दिसणार?
9
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
10
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
11
मोठी बातमी! फोक्सवॅगनने १.४ अब्ज डॉलर कर चोरला; आधीच संकटात, त्यात भारताने पाठविली नोटीस : रिपोर्ट
12
शेअर असावा तर असा...! 4 वर्षांत दिला 10000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; ₹1000 वर पोहोचला भाव
13
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
14
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
15
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
16
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
17
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
18
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
19
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
20
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट

जिल्ह्याचा व आदिवासी समाजाचा विकास काँग्रेसनेच केला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 04, 2020 12:44 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नवापूर : काँग्रेस पक्षाने नंदुरबार जिल्ह्याला आग्रस्थानी ठेवले आहे. आधार कार्ड योजनेची सुरूवातही जिल्ह्यातून झाली. आदिवासींच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनवापूर : काँग्रेस पक्षाने नंदुरबार जिल्ह्याला आग्रस्थानी ठेवले आहे. आधार कार्ड योजनेची सुरूवातही जिल्ह्यातून झाली. आदिवासींच्या विकासाचे व्रत काँग्रेसने स्विकारले आहे. त्यामुळे या खात्याचे मंत्रीपद जिल्ह्याला देण्यात येणार असल्याचे प्रतिपादन मंत्री बाळासाहेब थोरात यांनी बिलबारा, ता.नवापूर येथे केले.जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीत उमराण व भरडूसह संपूर्ण तालुक्यातील काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ नवापूर तालुक्यातील बिलबारा येथे झालेल्या जाहीर सभेत मंत्री थोरात बोलत होते. व्यासपीठावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुरूपसिंग नाईक, अमित देशमुख, आमदार शिरीष नाईक, काँग्रेसचे कार्याध्यक्ष दिलीप नाईक, उमराण गटातील उमेदवार अजित नाईक, भरडू गटाचे उमेदवार दीपक नाईक, राया मावची, दारासिंग गावीत, सरपंच सुदाम वळवी, सुरेश वळवी, आरीफ बलेसरीया, अय्युब बलेसरीया, अजय पाटील आदी उपस्थित होते.बाळासाहेब थोरात म्हणाले की, सुरूपसिंग नाईक यांनी केलेल्या विकास कामांमुळे आमदार शिरीष नाईक विधानसभेत निवडून आले. त्यांनी आदिवासी समाजाचा विकास केला. पक्षाचे ज्येष्ठ नेते नाईक यांच्या तब्येतची नेहमी विचारपूस करीत असतात. काँग्रेस पक्ष आदिवासी समाजावर प्रेम करतो. तसेच आदिवासी महिलांना संरक्षण, युवकांना रोजगार, विविध योजना देण्यात येतील त्यामुळे नंदुरबार जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल, असे त्यांनी सांगितले.स्व.विलासराव देशमुख नेहमी सांगायचे काँग्रेस सरकारमध्ये आमचे मंत्रीपद निश्चित आहे की नाही हे माहीत नसायचे. परंतु प्रत्येक मंत्रीमंडळात मात्र सुरूपसिंग नाईक यांचे मंत्रीपद कायम असायचे. काँग्रेस पक्षाने आदिवासी नेते तथा आदिवासी जनतेला न्याय दिला आहे. त्यांनी पक्ष वाढवला आहे. नंदुरबार जिल्ह्याचा विकास केला. त्यामुळे त्यांची भूमिका ‘लयभारी’ राहिली आहे, असे मंत्री अमित देशमुख यांनी सांगितले.पक्षाने विविध मंत्रीपदे देवून जिल्ह्याचा विकास केला आहे. येत्या काळातही आदिवासी विकास खाते जिल्ह्यात मिळाले तर आदिवासींचा विकास नक्की होईल, असे प्रतिपादन आमदार शिरीष नाईक यांनी केले.मंत्री अमित देशमुख यांना भेटतांना माजी आमदार सुरुपसिंग नाईक यांनी स्व.विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब थोरात यांनीही सुरुपसिंग नाईक यांच्यासोबत केलेल्या कामातून मोठे अनुभव मिळाल्याचे सांगितले. यावेळी नाईक यांचे उमेदवार दोन्ही उमेदवार पूत्र व आमदार पूत्र उपस्थित होते.