लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : नव्याने कोरोना बाधीत रूग्ण आढळल्याने ते राहत असलेला परिसर पुन्हा कंटेनमेंट व बफरझोन म्हणून जाहीर करीत सील केले आहेत.शहरात नव्याने रचना करण्यात आलेल्या कंटेनमेंट व बफर झोनमध्ये न्यु बागवान गल्ली, सिद्धिकी चौक परिसर, बबन शाह नगर, महालक्ष्मी नगर, नितीन नगर, नागसेन नगर, गरीब नवाज कॉलनी, मक्का मस्जीद परिसर, दुरदर्शन कॉलनी, गॅस गोडाऊन परिसर, राम रहिम नगर, जुना पाडळदा रोड परिसर, मिरा नगर, गौसिया नगर, अंबाजी माता मंदिर परिसर, डॉ.बी.डी. पाटील रोड हॉस्पीटल परिसर, मॉजी नगर परिसर.कंटेनमेंट झोनची चतु: सिमेत उत्तरेकडील मॉजी नगरपासून पश्चिमेस खेतिया रस्त्यावरील मिशन बंगला पावेतो. पश्चिमेकडील खेतिया रस्त्यावरील मिशन बंगलापासून दक्षिणेस चार रस्त्यावरील पाण्याच्या टाकी पावेतो, दक्षिणेकडे चार रस्त्यावरील पाण्याच्या टाकीपासून पूर्वेस डोगरगांव रस्ता, पटेल रेसिडेन्सी पावेतो, पूर्वेकडे डोंगरगांव रोड, पटेल रेसिडन्सीपासून उत्तरेस गॅस गोडाऊन रस्त्याने माजी नगर पावेतो.बफर झोन चतु:सीमेत उत्तरेकडील नेहानगर, समता नगर, मुरली मनोहर कॉलनी, खेतिया रोड परिसर, पश्चिमेकडे पाडळदा चौफुली परिसर, मिरा नगर, गोसिया नगर, मिशन बंगला परिसर, टेकभिलाटी, अमरधाम, लुम गल्ली, पिंगाणा पुल, आझाद चौक, सरदार पटेल चौक कुकडेल तर दक्षिणेकडे शहादा नगरपालिका परिसर, गांधी नगर, एच.डी.एफ.सी. बँक, दिनदयाल नगर, संभाजी नगर, प्रेस मारूती परिसर, विकास हायस्कूल परिसर, स्टेट बँक परिसर, स्वामी समर्थ मंदीर परिसर, सिध्दीविनायक मंदीर परिसर, कोर्ट परिसर, जुने तहसील कार्यालय परिसर. तसेच पूर्वेकडे कुलकर्णी हॉस्पीटल परिसर, सुघोषाघंट मंदिर परिसर, तलाठी कॉलनी, कुबेर नगर, वृंदावन नगर, रमकुबाई नगर, डोंगरगांव रस्त्यावरील पूर्वेकडील परिसर नव्याने जाहीर करण्यात आलेल्या कंटेनमेंट झोन क्षेत्रातून सर्व प्रकारच्या वाहनांना मनाई करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सर्व प्रतिष्ठाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहे.या भागात केवळ अत्यावश्यक सेवा सुरू असणार आहेत. त्याचप्रमाणे अत्यावश्यक सेवा पुरवठादारांना सोशल डिस्टन्सिंग व इतर आरोग्य विषयक नियमांचे पालन करण्याचे सक्तीचे करण्यात आले असून, तशी व्यवस्था करण्याचे आदेशही या वेळी देण्यात आले आहेत.
शहाद्यात नवीन रूग्ण आढळलेल्या परिसरात कंटेनमेंट व बफर झोन जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 1:46 PM