बामसेफचे 8 रोजी प्रकाशात अधिवेशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:48 PM2018-07-06T12:48:19+5:302018-07-06T12:48:28+5:30

The convention in Bamcef's 8th light | बामसेफचे 8 रोजी प्रकाशात अधिवेशन

बामसेफचे 8 रोजी प्रकाशात अधिवेशन

Next

नंदुरबार : नंदुरबार जिल्हा बामसेफ युनिटचे जिल्हा अधिवेशन 8 जुलै रोजी दोन सत्रात प्रकाशा येथे आयोजित केले आहे.
या अधिवेशनाचा शुभारंभ आत्माराम इंदवे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रवींद्र मोरे, प्रविण खरे राहणार आहेत. या वेळी पहिले सत्र हे प्रबोधनाचे असून, यात मुळनिवासी बहुजन समाजातील वाढत्या बेकारीसाठी प्रस्थापित शासक वर्ग व त्यांचा कार्पोरेट वर्गच जबाबदार आहे या विषयावर चर्चा होणार असून, यावर नंदुरबा येथील महिला महाविद्यालयाचे प्रा.डी.व्ही. वाघ, व्ही.एम. पाटील, रॉबिन नाईक हे मार्गदर्शन करणार आहेत.
दुस:या प्रतिनिधी सत्र राहणार असून, यात संघटनात्मक लोकतांत्रिक व्यवस्थेच्या संवर्धनासाठी केडर्सची भूमिका या विषयावर जिल्हाभरातून आलेले बामसेफचे कार्यकर्ते मत मांडणार आहेत. 
जिल्हा अधिवेशनास उपस्थित राहण्याचे आवाहन नंदुरबार जिल्हाध्यक्ष पावबा ठाकरे, रवीशंकर सामुद्रे, अनिल भामरे, नारायण धनगर, परमेश्वर मोरे, हेमकांत मोरे, बी.एस. पवार, डॉ.गौतम भामरे, ललिता शिरसाठ, गोरख पवार, स्वप्निल सामुद्रे, नागसेन पेंढारकर, संदेश गायकवाड, सुशील ससाणे, संजय जाधव, अशोक पवार, इरफान सैय्यद, पंढरीनाथ सोनवणे, अनिल पटेल, योगेश हिरे, राजेश पवार यांनी केले आहे.
 

Web Title: The convention in Bamcef's 8th light

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.