लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोना बाधीतांचा आकडा १६० दिवसात पाच हजार पार झाला आहे. गेल्या दोन महिन्यात रुग्णांची वाढ तब्बल तिप्पट झाली आहे. शिवाय स्थानिक ठिकाणी होणाऱ्या चाचण्या आणि चाचण्यांची वाढविलेली संख्या यामुळेदेखील रुग्णसंख्या वाढल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, जिल्ह्याचा मृत्यूदर हा गेल्या महिनाभरापासून स्थिर झाला आहे. सद्या मृत्यूदर हा २.०३ इतका आहे. पूर्वी पाच पेक्षा अधीक होता.कोरोनाने अखेर पाच हजाराचा टप्पा पार केला आहे. जिल्ह्यात पहिला रुग्ण १८ एप्रिल रोजी सापडला होता. त्यानंतर दोन महिने अर्थात मे व जून महिन्यात रुग्ण संख्या मर्यादीत राहत होती. परंतु जुलै महिन्यात लॉकडाऊन शिथील झाले आणि रुग्ण संख्येने वाढीचा वेग पकडला. जून महिन्याच्या अखेर असलेली १६३ रुग्ण संख्या ही जुलै महिन्याच्या अखेरीस ५४७, आॅगस्ट महिन्याअखेर २,६०५ तर आज अखेर तब्बल पाच हजारापेक्षा अधीक गेली आहे.सर्वाधिक नंदुरबार तालुकाजिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण हे नंदुरबार तालुक्यात आढळले आहेत. सद्या तालुक्यात ३३६ रुग्ण उपचार घेत आहेत. एकुण १,९५१ रुग्ण आढळले तर १,५६७ रुग्ण बरे झाले. मृत्यू देखील नंदुरबार तालुक्यातच सर्वाधिक अर्थात ४६ इतके आहेत. तालुक्यात तब्बल ७,६५१ जणांचे स्वॅब घेतले गेले आहेत.शहादा तालुक्यात सद्या २९८ रुग्ण उपचार घेत आहेत. एकुण १,७०१ रुग्ण आढळून आले असून १,३६७ रुग्ण बरे झाले आहेत. ३७ जणांचा मृत्यू झाला असून ५,६४४ जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत.तळोदा तालुक्यात ७७ रुग्ण उपचार घेत आहेत. एकुण ४९० रुग्ण आढळून आले, ३९४ रुग्ण बरे झाले असून १६ जणांचा मृत्यू झाला आहे. एकुण १,५३५ जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. नवापूर तालुक्यात ८९ जण उपचार घेत असून ४५४ रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील ३५१ रुग्ण बरे झाले आहेत. १५ जणांचा मृत्यू झाला असून १,३७५ जणांचे स्वॅब तपासण्यात आले आहेत. ंअक्कलकुवा तालुक्यात ६१ रुग्ण उपचार घेत आहेत.१८२जण आढळून आले असून त्यापैकी १२० रुग्ण बरे झाले आहेत. एकाचा मृत्यू झाला तर ७७७ जणांचे स्वॅब तपासण्यात आले. धडगाव तालुक्यात सद्य स्थितीत एकही रुग्ण उपचार घेत नाही. आतापर्यंत १४ रुग्ण आढळून आले असून १३ जण बरे झाले आहेत तर एकाचा मृत्यू झाला आहे. एकुण ११३ जणांची स्वॅब तपासणी करण्यात आली आहे.मृत्यूदर झाला स्थिरजिल्ह्याचा मृत्यूदर हा २.०३ टक्केपर्यंत खाली आला आहे. पूर्वी हाच दर तब्बल पाच पेक्षा अधीक होता. कोरोना चाचण्या वाढल्यामुळे रुग्ण संख्या वाढली. परिणामी मृत्यू दर कमी झाल्याचे दिसून येत आहे. आतापर्यंत ११६ जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक मृत्यू अर्थातच नंदुरबार तालुक्यात आहेत तर अक्कलकुवा व धडगाव तालुक्यात प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.चाचण्या वाढविल्याकोरोना चाचण्या वाढविण्यात आल्या आहेत. आतापर्यंत तब्बल १७ हजार ५८८ जणांच्या कोरोना चाचण्या करण्यात आल्या. सर्वाधिक चाचण्या या नंदुरबार तालुक्यात ७,६५१ इतक्या झाल्या आहेत.विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दररोज किमान ५००जणांचे स्वॅब संकलन करून तेव्हढा चाचण्या कराव्या अशा सुचना दिल्या आहेत. परंतु आतापर्यंत ३०० पेक्षा अधीक चाचण्या होऊ शकल्या नाहीत ही वस्तू स्थिती आहे.
१६० दिवसात पाच हजाराचा टप्पा पार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2020 12:33 PM