कोरोनाच्या संकटकाळात यंदा दशामाता उत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2020 12:02 PM2020-07-01T12:02:04+5:302020-07-01T12:02:25+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दशामाता उत्सवासाठी शहरातील कारागिरांकडून मूर्ती घडविण्यास सुरुवात झाली आहे. एक हजारापेक्षा अधीक मूर्र्तींची दरवर्षी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : दशामाता उत्सवासाठी शहरातील कारागिरांकडून मूर्ती घडविण्यास सुरुवात झाली आहे. एक हजारापेक्षा अधीक मूर्र्तींची दरवर्षी येथे विक्री होते. याचा अर्थ दरवर्षी हा उत्सव अधीक व्यापक प्रमाणात साजरा होत आहे. यंदा कोरोनामुळे सार्वजनिक उत्सवावर मर्यादा राहणार असली तरी घरगुती स्वरूपात मूर्तीची प्रतिष्ठापणा करून उत्सव साजरा होणार आहे.
गुजरात राज्यातील मुख्य उत्सवांपैकी एक असलेला दशा माता उत्सव. नंदुरबारची नाळ गुजरातशी जोडल्या गेल्याने तेथील उत्सव, सस्कृती, सण यांचा प्रभाव जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. त्यातीलच एक दशामाता उत्सव. जिल्ह्यात विशेषत: नंदुरबार शहर व गुजरात राज्याच्या सिमेलगतच्या गावांमध्ये पूर्वी हा उत्सव तुरळक प्रमाणात साजरा होत होता. गेल्या तीन ते चार वर्षांपासून घरोघरी हा उत्सव साजरा होऊ लागला आहे. त्यामुळे पूर्वी मोजक्याच स्वरूपात दशामातेच्या मूर्ती तयार केल्या जात होत्या. गेल्या काही वर्षांपासून मात्र मूर्र्तींची मागणी वाढत गेल्याने हा आकडा आता दीड हजारापर्यंत पोहचला आहे.
खास महिलांसाठी असणाºया या उत्सवाला आता सार्वजनिक स्वरूप येऊ लागले आहे. मातेची प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणुकीला सार्वजनिक स्वरूप येऊ लागले आहे. दशा मातेच्या मूर्तीचे काम येथील स्थानिक मूर्तीकार परेश सोनार यांच्यासह इतर मूर्ती कारागिर करतात. आर्डरप्रमाणे तसेच किरकोळ विक्रीसाठी मूर्तीचे काम केले जाते. त्यासाठी लागणारे पीओपी व कलर गुजरात राज्यातून मागविले जातात. यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कच्चा माल उशीराने मागविला गेला. शिवाय मालाची कमतरता असल्यामुळे भाव काही प्रमाणात वाढली आहे. असे असले तरी मूर्तीच्या किंमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे सोनार यांनी सांगितले. साधारणत: ५१ रुपयांपासून दीड हजार रुपयांपर्यंत मूर्तीची किंमती आहेत.
नंदुरबारसह गुजरातमधील निझर, वेळदा, कुकरमुंडा येथे तसेच शहादा, तळोदा व धुळे आणि जळगाव येथील ग्राहक देखील मूर्ती घेण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून नंदुरबारात येऊ लागले आहेत. मूर्तीला शृंगार करून देण्याची देखील सोय करण्यात येत असते. हार, नथ, कानातले, मुकूट, गंगावेणी व ओढणी यांच्या सहायाने मूर्तीची सजावट करण्यात येते. महिलावर्गाकडून त्यालाही चांगली मागणी असते. १० दिवसांच्या या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा या कार्यक्रमांना कोरोना आणि रात्रीच्या संचारबंदीचा फटका बसण्याची शक्यता आहे.
कोरोनामुळे सर्वच उत्सव व कार्यक्रमांवर मर्यादा आली आहे. त्याचा फटका दशामाता उत्सवाला देखील बसण्याची शक्यता आहे. येत्या काळात अर्थात श्रावण महिन्यापासून सण, उत्सवांची रेलचेल राहणार आहे. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने आधीच सार्वजनिक उत्सवांवर मर्यादा घालून दिल्या आहेत. ही बाब लक्षात घेता यंदा दशा माता उत्सव देखील साध्या पद्धतीनेच साजरा करावा लागणार हे स्पष्टच आहे. असे असले तरी भाविकांकडून तयारीला मात्र वेग आला आहे.