शहरं
Join us  
Trending Stories
1
बायडेन यांच्यासारखी मोदींची स्मरणशक्ती हरवत चालली हे राहुल गांधींचे वक्तव्य दुर्दैवी; परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया
2
Eknath Shinde: एकनाथ शिंदेंचा प्रसारमाध्यमांशी बोलण्यास नकार, मूळ गावी पोहोचले, किती दिवसांचा मुक्काम...
3
भारताचा जीडीपी कोसळला, दोन वर्षांच्या निच्चांकी पातळीवर; महागाई, वाढलेले व्याजदर कारण
4
वक्फ बोर्डच्या १० कोटींच्या निधीबाबत देवेंद्र फडणवीसांचे ट्विट; म्हणाले, "नवीन सरकार येताच..."
5
Ayush Badoni ची कॅप्टन्सी! प्लेइंग इलेव्हनमधील सर्वांनी गोलंदाजी करत सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड
6
महाराष्ट्र निवडणुकीचे आकडे बदलणार...? काँग्रेसनं टाकला मोठा डाव; EC निर्णय घेणार!
7
जितेंद्र आव्हाडांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट! राजकीय वर्तुळात चर्चा
8
निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी किती दिवसांत शपथ घेणे बंधनकारक आहे? काय सांगतो नियम? पाहा...
9
रश्मिका मंदानाने केला 'सामी सामी' वर डान्स, हटके ब्लॅक साडीत दिसतेय हॉट!
10
एकनाथ शिंदे नाही, तर कोण? शिवसेनेतून उपमुख्यमंत्रिपदासाठी 'या' 5 नावांची चर्चा...
11
अजमेर शरीफ वादावरून मेहबूबा मुफ्ती संतापल्या; म्हणाल्या, "आता मुस्लिमांच्या घरात मंदिर शोधतील"
12
Samantha Ruth Prabhu: समंथा रुथ प्रभूच्या वडिलांचं निधन, अभिनेत्रीने शेअर केली भावुक पोस्ट
13
म्हशीमुळे मालकाला भरावा लागला ९ हजार रुपयांचा दंड; असं काय घडलं?
14
तुमचा पगार, पॅकेजच नाही, ऑफिसमध्ये या ९ गोष्टीही बोलू नका; नोकरी करताय तर नक्कीच घ्या हा सल्ला...
15
Ananya Panday : चंकी पांडे यांच्या 'या' कृतीने अनन्या पांडे त्रस्त; इन्स्टाग्राम डिलीट करण्याचा दिला सल्ला
16
"तुमचा मित्र हिंदूंना चिरडतोय"; इन्फोसिसच्या माजी सीईओंनी मोहम्मद युनूस यांच्या मित्राला सुनावलं
17
तिढा सुटेना, महायुतीचे नेते पुन्हा दिल्लीला जाणार, का होतोय सत्तास्थापनेस उशीर? 
18
Video: 'सुपरमॅन' कॅच! तुफान वेगाने जाणाऱ्या चेंडूवर फिल्डरने हवेतच घेतली चित्त्यासारखी झेप
19
एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा; राजकीय गदारोळात उदय सामंतांकडून महत्त्वाचा खुलासा
20
गोंदिया-कोहमारा मार्गावर शिवशाही बसचा भीषण अपघात! ११ जणांचा मृत्यू; मुख्यमंत्र्यांकडून मदत जाहीर

कोरोनाच्या संकटकाळात यंदा दशामाता उत्सव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2020 12:02 PM

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : दशामाता उत्सवासाठी शहरातील कारागिरांकडून मूर्ती घडविण्यास सुरुवात झाली आहे. एक हजारापेक्षा अधीक मूर्र्तींची दरवर्षी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : दशामाता उत्सवासाठी शहरातील कारागिरांकडून मूर्ती घडविण्यास सुरुवात झाली आहे. एक हजारापेक्षा अधीक मूर्र्तींची दरवर्षी येथे विक्री होते. याचा अर्थ दरवर्षी हा उत्सव अधीक व्यापक प्रमाणात साजरा होत आहे. यंदा कोरोनामुळे सार्वजनिक उत्सवावर मर्यादा राहणार असली तरी घरगुती स्वरूपात मूर्तीची प्रतिष्ठापणा करून उत्सव साजरा होणार आहे.गुजरात राज्यातील मुख्य उत्सवांपैकी एक असलेला दशा माता उत्सव. नंदुरबारची नाळ गुजरातशी जोडल्या गेल्याने तेथील उत्सव, सस्कृती, सण यांचा प्रभाव जिल्ह्यात बऱ्याच प्रमाणात दिसून येतो. त्यातीलच एक दशामाता उत्सव. जिल्ह्यात विशेषत: नंदुरबार शहर व गुजरात राज्याच्या सिमेलगतच्या गावांमध्ये पूर्वी हा उत्सव तुरळक प्रमाणात साजरा होत होता. गेल्या तीन ते चार वर्षांपासून घरोघरी हा उत्सव साजरा होऊ लागला आहे. त्यामुळे पूर्वी मोजक्याच स्वरूपात दशामातेच्या मूर्ती तयार केल्या जात होत्या. गेल्या काही वर्षांपासून मात्र मूर्र्तींची मागणी वाढत गेल्याने हा आकडा आता दीड हजारापर्यंत पोहचला आहे.खास महिलांसाठी असणाºया या उत्सवाला आता सार्वजनिक स्वरूप येऊ लागले आहे. मातेची प्रतिष्ठापना व विसर्जन मिरवणुकीला सार्वजनिक स्वरूप येऊ लागले आहे. दशा मातेच्या मूर्तीचे काम येथील स्थानिक मूर्तीकार परेश सोनार यांच्यासह इतर मूर्ती कारागिर करतात. आर्डरप्रमाणे तसेच किरकोळ विक्रीसाठी मूर्तीचे काम केले जाते. त्यासाठी लागणारे पीओपी व कलर गुजरात राज्यातून मागविले जातात. यंदा कोरोना आणि लॉकडाऊनमुळे कच्चा माल उशीराने मागविला गेला. शिवाय मालाची कमतरता असल्यामुळे भाव काही प्रमाणात वाढली आहे. असे असले तरी मूर्तीच्या किंमती स्थिर ठेवण्याचा प्रयत्न असल्याचे सोनार यांनी सांगितले. साधारणत: ५१ रुपयांपासून दीड हजार रुपयांपर्यंत मूर्तीची किंमती आहेत.नंदुरबारसह गुजरातमधील निझर, वेळदा, कुकरमुंडा येथे तसेच शहादा, तळोदा व धुळे आणि जळगाव येथील ग्राहक देखील मूर्ती घेण्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून नंदुरबारात येऊ लागले आहेत. मूर्तीला शृंगार करून देण्याची देखील सोय करण्यात येत असते. हार, नथ, कानातले, मुकूट, गंगावेणी व ओढणी यांच्या सहायाने मूर्तीची सजावट करण्यात येते. महिलावर्गाकडून त्यालाही चांगली मागणी असते. १० दिवसांच्या या उत्सवात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यंदा या कार्यक्रमांना कोरोना आणि रात्रीच्या संचारबंदीचा फटका बसण्याची शक्यता आहे.कोरोनामुळे सर्वच उत्सव व कार्यक्रमांवर मर्यादा आली आहे. त्याचा फटका दशामाता उत्सवाला देखील बसण्याची शक्यता आहे. येत्या काळात अर्थात श्रावण महिन्यापासून सण, उत्सवांची रेलचेल राहणार आहे. परंतु कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शासनाने आधीच सार्वजनिक उत्सवांवर मर्यादा घालून दिल्या आहेत. ही बाब लक्षात घेता यंदा दशा माता उत्सव देखील साध्या पद्धतीनेच साजरा करावा लागणार हे स्पष्टच आहे. असे असले तरी भाविकांकडून तयारीला मात्र वेग आला आहे.