प्रकाशा येथे पाण्याच्या लोंढय़ात सापडल्याने एकाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2018 12:07 PM2018-07-15T12:07:33+5:302018-07-15T12:07:39+5:30

The death of one due to the discovery of water in the water reservoir here | प्रकाशा येथे पाण्याच्या लोंढय़ात सापडल्याने एकाचा मृत्यू

प्रकाशा येथे पाण्याच्या लोंढय़ात सापडल्याने एकाचा मृत्यू

Next

प्रकाशा : तापी नदीकाठावर हातपाय धुत असताना अचानक आलेल्या लोंढय़ात वाहून गेल्याने 50 वर्षीय व्यक्तीचा बुडून मृत्यू झाला़ ही घटना शनिवारी दुपारी एक वाजता प्रकाशा ता़ शहादा गावातील संगमेश्वर मंदिर परिसरात घडली़ 
गुलाब विठ्ठल ङिांगाभोई (50) हे शनिवारी दुपारी 1 वाजेच्या सुमारास हातपाय धुण्यासाठी तापी नदी पात्राकडे गेले होत़े काठालगत हातपाय धुत असतानाच अचानक पाण्याचा मोठा लोंढा आल्याने ते वाहून गेल़े यावेळी या भागात उपस्थित असलेल्यांनी आरडाओरड केली़ दरम्यान याच भागात मासेमारी करणा:या सिताराम भगत, गटूर ङिांगाभोई यांनी पाण्यात उडय़ा घेत गुलाब ङिांगाभोई यांना वाचवण्याचा प्रयत्न केला़ परंतू वेगवान प्रवाह आणि पाण्याची वाढलेली पातळी यामुळे ते हाती आले नाहीत़ अखेर दोन तासांपेक्षा अधिक वेळानंतर गुलाब ङिांगाभोई यांचा मृतदेह बाहेर काढण्यात त्यांना यश आल़े यानंतर प्रकाशा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी डॉ़ जितेंद्र पवार यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केल़े यावेळी सरपंच भावडू ठाकरे, उपसरपंच भरत पाटील, ग्रामपंचायत सदस्य महेंद्र भोई, पंडीत धनराळे, आकाश भिल, गजानन निकवाडे, मोतीराम बर्डे, विनोद ङिांगाभोई आदी उपस्थित होत़े 
प्रकाशा पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस हेड कॉन्स्टेबल पांडूरंग गवळी, पोलीस कॉन्स्टेबल वंतू गावीत, निलेश सांगळे यांनी पंचनामा करत अकस्मात मृत्यूची नोंद केली़ 
 

Web Title: The death of one due to the discovery of water in the water reservoir here

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.