आॅनलाईन लोकमतनंदुरबार, दि.८ : भाजपाने तीन वर्षांपूर्वी सत्ता हस्तगत केली. या दरम्यान नगरविकासाला चालना देण्याचा आम्ही प्रयत्न केला. आता शहराच्या जीडीपी मार्फत शहराचा विकास करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तळोदा येथील प्रचारसभेत केले.तळोदा नगरपालिकेसाठी निवडणुक होत आहे. शुक्रवार ८ रोजी त्यांची जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. आपल्या भाषणात त्यांनी नगरविकास विभागाच्या माध्यमातून विकासाला चालना दिल्याचे सांगितले. तीन वर्षाच्या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वच शहर हगणदरीमुक्त करण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले.
महाराष्ट्रातील २४ नगरपालिकांनी कचºयापासून खत तयार करून हरित किसान ब्रॅन्ड तयार केल्याचे त्यांनी सांगितले. २०१९ पर्यंत राज्य सरकार प्रत्येकाला हक्काचे घर देणार आहे.एकही व्यक्ती घरापासून वंचित राहणार नाही अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. तळोदा नगरपालिकेत विकास कामे झाली नाही. पारदर्शक कारभार न झाल्यास ही नगरपालिका बरखास्त करण्याचा इशारा त्यांनी यावेळी दिला. यावेळी नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय परदेशी यांना कचºयाची विल्हेवाट लावून शहर सुरक्षित करा अशी विनंती त्यांनी केली.
सॅटेलाईट सर्व्हेक्षणामुळे कर चुकवेगिरीला प्रतिबंध : मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत निवडणुकीसाठी भाजपाच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवारांसाठी येथे प्रचारसभा घेतली. यावेळी बोलतांना त्यांनी सांगितले की, नगरपालिकाक्षेत्रात करचुकवेगीरीचे प्रमाण वाढत आहे. ते टाळण्यासाठी शासनाने नगरपालिका व नगरपंचायतींना मालमत्तांची सॅटेलाईटद्वारे तपासणी करण्याचे निर्देश दिले आहे. त्यामुळे करचुकवेगिरीला प्रतिबंध बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२२ पर्यंत बेघरांना घर देण्याची घोषणा केली आहे. मात्र २०१९ पर्यंत राज्यात हा ड्रीम प्रोजेक्ट पूर्ण करण्याचा राज्य शासनाचा संकल्प असल्याचे त्यांनी जाहीर सभेत सांगितले.