नंदुरबारात शिक्षक दरबारात विविध विषयांवर चर्चा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2018 11:24 AM2018-12-11T11:24:02+5:302018-12-11T11:24:06+5:30
नंदुरबार : शहरातील श्रॉफ हायस्कूलमध्ये शिक्षक दरबारचे आयोजन करण्यात आले होत़े यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासह शिक्षण विभागातील ...
नंदुरबार : शहरातील श्रॉफ हायस्कूलमध्ये शिक्षक दरबारचे आयोजन करण्यात आले होत़े यावेळी शिक्षक आमदार किशोर दराडे यांच्यासह शिक्षण विभागातील अधिका:यांनी शिक्षकांच्या समस्या जाणून घेत चर्चा केली़
यावेळी नाशिक विभागाचे शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव, माध्यमिक शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम, संभाजी पाटील, मुख्याध्यापक संघटनेचे उपाध्यक्ष महेंद्र फटकाळ, रफीक जहागिरदार शिक्षक संघटनेचे प्रा. आय.डी पाटील , निशिकांत शिंपी, आसिफ शाह , जयेश वाणी यांच्यासह वेतन पथकाचे वरिष्ठ अधिकारी, अधिक्षक तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होत़़े
या जनता दरबारात किरकोळ तक्रारी वगळता ठोस अशी एकही तक्रार करण्यात आली नाही़ अनेकांनी वैयक्तिक स्वरुपाच्या तक्रारी मांडल्यानंतर त्यांचा निपटारा करण्यात आला़ वैयक्तिक तक्रारी मांडल्या त्याचा समाधानपूर्वक निपटारा करण्यात आला़ यादरम्यान आमदार दराडे व शिक्षण उपसंचालक जाधव यांनी तक्रारी विहित मुदतीत निकाली काढण्याबाबत जिल्हा शिक्षण विभागाला सूचना केल्या़ तसेच मुख्याध्यापक संघाच्या वतीने आरटीई प्रमाणपत्राबाबत समस्या मांडण्यात आल्यानंतर आमदारांसह शिक्षण उपसंचालकांनी त्यावर कारवाई करण्याचे सांगून शिक्षकांसोबत संवाद साधला़ कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.आय.डी.पाटील यांनी केल़े