पोस्ट पेमेंटच्या माध्यमातून ३२ लाख रुपयांचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2020 01:51 PM2020-04-26T13:51:10+5:302020-04-26T13:51:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : ‘बडे डाक खाने से आता लाता कभी रुपैया, कभी किताबें दे जाता है मुझ ...

 Distribution of Rs. 32 lakhs through post payment | पोस्ट पेमेंटच्या माध्यमातून ३२ लाख रुपयांचे वाटप

पोस्ट पेमेंटच्या माध्यमातून ३२ लाख रुपयांचे वाटप

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : ‘बडे डाक खाने से आता लाता कभी रुपैया, कभी किताबें दे जाता है मुझ को हँस हँस भैया...’ बालपणीच्या कवितेतील मुन्शीराम डाकियाचे वर्णन आठवण्याचे कारण म्हणजे आजच्या ‘डाकिया’ने संचारबंदीच्या काळात ग्रामीण जनतेला दिलेला दिलासा. इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या माध्यमातून पोस्टाचे प्रतिनिधी गावात जाऊन पैसे वाटप करीत असून आठवडाभरात दोन हजार ३९२ खातेदारांना ३२ लाख ७२ हजार रुपयांचे वितरण करण्यात आले आहे.
डाक सेवेच्या उपयुक्तता तंत्रज्ञान युगात कमी होते की काय अशी शंका वाटत असताना या विभागाने कात टाकून नवे तंत्रज्ञान आत्मसात केले आहे. नव्या सेवांचा समोवश आपल्या कामकाजात करून वेळोवेळी आपली उपयुक्ततादेखील सिद्ध केली आहे. कोरोनाच्या संकटवेळी बँकेतील गर्दी टाळणे आवश्यक असताना इंडियन पोस्ट पेमेंट बँकेने गावपातळीवर आपले काम नेऊन नागरिकांना चांगली सेवा दिली आहे. केवळ आधार कार्ड आणि मोबाईल जवळ असला तरी नागरिकांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना किंवा अन्य योजनेच्या माध्यमातून आधार लिंक बँक खात्यात जमा झालेली रक्कम काढता येत आहे. इतर सार्वजनिक बँकांमधील रक्कमदेखील काढण्याची सुविधा गावपातळीवर उपलब्ध झाली आहे. या सुविधेसोबत सार्वजनिक बँक अधिकृत ग्राहक सेवा केंद्राच्या १७० प्रतिनिधींमार्फतदेखील गावपातळीवर रक्कम काढण्याची सुविधा करून देण्यात आली आहे. या सेवेच्या माध्यामातून आतापर्यंत ५४ हजार ९५८ खात्यातील चार कोटी ३५ लाख रुपये वितरीत करण्यात आले आहे.
इंडिया पोस्ट पेमेंट बँकेच्या शाखेतून प्रतिनिधी परिसरातील तीन ते चार गावात जाऊन ही सुविधा देतात. एकावेळी एक हजार रुपये काढण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक प्रतिनिधी एका दिवसात २५ हजार रुपयांचे वितरण करू शकतो. गावात अधिक ग्राहक असल्यास सर्व ग्राहकांना पैसे वितरीत होईपर्यंत गावात ही सुविधा दिली जाते. त्यामुळे शहरात बँकेतील गर्दी कमी होण्याबरोबर नागरिकांचा त्रासदेखील वाचला आहे. विशेषत: गरजू महिला आणि वृद्धांना या सुविधेचा चांगला उपयोग होत आहे. त्यामुळे गावात पूर्वीसारखी ‘डाकिया’ची वाट पाहिली जात आहे.

Web Title:  Distribution of Rs. 32 lakhs through post payment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.