मत्स्य शेतीसाठी जिल्ह्यात पोषक वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 12:47 PM2018-12-16T12:47:47+5:302018-12-16T12:47:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला मोठा वाव आहे. सरदार सरोवर प्रकल्पाचे बॅक वॉटर, तापीवरील बॅरेजस, इतर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : जिल्ह्यात मत्स्य व्यवसायाला मोठा वाव आहे. सरदार सरोवर प्रकल्पाचे बॅक वॉटर, तापीवरील बॅरेजस, इतर लहान मोठय़ा नदींवरील बंधारे आणि शेततळे या माध्यमातून मत्स्य व्यवसाय करता येऊ शकतो त्यासाठी नियोजन आणि मार्गदर्शनाची गरज आहे. येत्या काळात या व्यवसायाला अधीक व्यापक स्वरूप देण्यासाठी प्रय} करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्य व्यवसायावर आधारीत एक दिवशीय चर्चासत्रात देण्यात आली.
जिल्हाधिकारी कार्यालयात या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.एम.कलशेट्टी, केंद्रीय मत्स्य व्यवसाय महाविद्यालयाचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ.एन.के.चड्डा, वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ.किरण दुबे, सहायक जिल्हाधिकारी वान्मती सी., के.बी.राजू, मत्स्यव्यवसाय विभागाचे सहायक आयुक्त किरण पाडवी उपस्थित होते. जलकृषी की तकनीकी जागृकता, भारतीय कृषी अनुसंधान प्रकल्प, केंद्रीय मस्त्यिकी शिक्षण संस्था मुंबई, मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्त यांच्या संयुक्त विद्यमाने या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ.एन.के.चड्डा यांनी मत्स्य उत्पादन, त्याचे बारकावे, कुठल्या पाण्यात कसे उत्पादन व कुठल्या जातीचे उत्पादन घेतले जावे, संगोपन आणि संवर्धन यासह इतर अनेक बाबींवर मार्गदर्शन केले. समुद्र आणि समुद्र तटावरच मत्स्य उत्पादन ही बाब आता कालबाह्य ठरू लागली आहे. त्यामुळे या क्षेत्रात आणि व्यावसायात मोठी संधी असल्याचे त्यांनी सांगितले. शेतक:यांना मत्स्यव्यवसाय तंत्रज्ञानासाठी जास्तीत जास्त माहिती देणे हा चर्चासत्राचा उद्देश आहे. त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी प्रय} केला जाईल.
शेतक:यांशी चर्चा करून महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी पोषक वातावरण आहे त्या ठिकाणी मत्स्यव्यवसायातून शेतक:यांना अधिकाधिक फायदा होईल याकडे लक्ष देण्याचा आपला प्रय} असल्याचेही डॉ.चड्डा यांनी सांगितले.
डॉ.किरण दुबे यांनी या व्यवसायातील मार्केटींग आणि इतर बाबींविषयी मार्गदर्शन केले.के.बी.राजू यांनीही मार्गदर्शन केले.
जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी अध्यक्षीय मनोगतात सांगितले, जिल्ह्यातून तापी, नर्मदा, रंगावली या नद्या व इतर प्रकल्पाच्या माध्यमातून मत्स्यव्यवसायास मोठा वाव आहे.
जिल्ह्यातील शेतक:यांनी शेतीबरोबरच मत्स्यव्यसाय जोडधंदा म्हणून केल्यास शेतक:यांना मोठय़ा प्रमाणात आर्थिक लाभ होऊ शकतो. या व्यवसायासाठी जिल्हा नियोजन समिती व आदिवासी विकास प्रकल्पातून निधी उपलब्ध करून दिला जाईल असेही त्यांनी सांगितले.
यावेळी मच्छीमार सोसायटीचे सदस्य व शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
सरदार सरोवरच्या बॅक वॉटरमधील उदय आणि इतर नद्यांमध्ये या भागातील आदिवासी मच्छिमार संस्था मोठय़ा प्रमाणावर माशांचे उत्पादन घेत आहे.
जिल्ह्यात शेततळ्यांची संख्या देखील वाढली आहे. शेततळ्यांमध्ये देखील मत्स्य उत्पादन घेण्यासाठी प्रवृत्त करण्यात येणार आहे.
प्रकाशा आणि सारंगखेडा बॅरेजमध्ये देखील मत्स्य बीज मोठय़ा प्रमाणावर सोडण्यात आले आहे.