अफवांवर विश्वास ठेवू नका : म्हसावद येथे जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:49 PM2018-07-06T12:49:36+5:302018-07-06T12:49:42+5:30

सोशल मीडियाचा वापर जपून करा

Do not trust rumors: Public awareness in Mhasawad | अफवांवर विश्वास ठेवू नका : म्हसावद येथे जनजागृती

अफवांवर विश्वास ठेवू नका : म्हसावद येथे जनजागृती

Next

म्हसावद : म्हसावद येथे अनुगामी लोकराज्य महाभियान भाग शहादा यांच्या माध्यमातून  ‘अफवा थांबवा’ व ‘सोशल मीडियाचा कसा वापर करावा’ या संदर्भात कार्यक्रम घेण्यात आला. 
राज्यभरात मुले चोरी करणा:या टोळीची अफवा पसरली आह़े व या अफवांमुळे काही लोकांना जबर मारहाणसुध्दा झाल्याच्या घटना घडल्या आहेत़ यातून काहींना आपला जीव ही गमवावा लागला. याचा विचार करता अनुगामी लोकराज्य महाभियान भाग शहादा यांच्या माध्यमातून याबाबत जनजागृती करण्याचा निर्णय घेतला. बुधवारी  सायंकाळी श्री राम मंदिर म्हसावद येथे अफवा थांबवा हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून शहादा येथील उपविभागीय पोलीस अधिकारी महारू पाटील, पोलीस निरीक्षक राकेश चौधरी  उपस्थित होते. त्यांचे श्रीमद भगवतगीता ग्रंथ व शाल देऊन स्वागत करण्यात आले. त्यांनी सोशल मीडियाचा कसा वापर केला पाहिजे यावर सखोल मार्गदर्शन केले.
सध्याच्या आधुनिक युगात सर्वात जलद बातमी प्रसारासाठी आणखी एक माध्यमाची भर पडली आहे ती म्हणजे सोशल मीडियाची. परंतु अलीकडच्या काळात या सोशल मिडियाचा अविचारीपध्दतीने वापर होताना दिसत आहे. कुठलाही विचार न करता कोणतीही माहिती प्रसारित केली जात आहे. त्यामुळे अनेक  अप्रिय घटना घडत आहेत़ त्यामुळे सोशल मीडियाच्या वापराविषयी जनजागृती होणे गरजेचे असल्याचे  मत मान्यवरांकडून व्यक्त करण्यात आल़े 
यावेळी म्हसावदच्या सरपंच अक्काबाई ठाकरे, श्री रेणुका फाऊंडेशनचे चेअरमन चिंतामण लांडगे, अजरुन काळ, दिलीप लांडगे  तसेच ग्रामस्थ आदी उपस्थित होत़े
 

Web Title: Do not trust rumors: Public awareness in Mhasawad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.