मनोज शेलार ।ऑनलाईन लोकमतदिनांक 18 ऑगस्टनंदुरबार : कुपोषित बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात 78 ठिकाणी ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. या केंद्रात भरती होणा:या कुपोषीत बालकावर दिवसाला 55 रुपये तर त्याला आणणा:या पालकावर 105 रुपये खर्च करण्यात येणार आहे. त्यामुळे कुपोषण बालकाचे कमी होईल की पालकाचे हा संशोधनाचाच विषय ठरणार आहे. जिल्ह्यात विशेषत: धडगाव व अक्कलकुवा तालुक्यात कुपोषीत बालकांना सामान्य श्रेणीत आणण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. त्याअंतर्गत महिला व बालकल्याण विभागातर्फे ज्या भागात सर्वाधिक कुपोषीत बालके आहेत त्या भागातील गावांमध्ये अंगणवाडीच्या माध्यमातून ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेने ठराव करून तब्बल दोन कोटी रुपये खर्चास देखील मान्यता दिली आहे. असा होईल खर्चग्राम बालविकास केंद्रात बालकाला आणल्यानंतर त्याला विशिष्ट आहार, पोषक औषधी दिली जातील. एका दिवसाला या माध्यमातून बालकावर 55 रुपये खर्च करण्याची तरतूद आहे. या बालकाला जो पालक अर्थात आई किंवा वडिल यापैकी एकजण घेवून येईल त्याला त्याची बुडीत मजुरीपोटी त्याला 85 रुपये रोज आणि एक वेळ जेवनाचा भत्ता म्हणून 25 रुपये दिले जाणार आहेत. अर्थात बालकावर 55 रुपये तर त्याच्या पालकावर 105 रुपये खर्च होणार आहे. बालकापेक्षा पालकावर 50 रुपये जादा खर्च राहणार आहे.केंद्रात बालकांना सुविधाग्राम बालविकास केंद्रात बालके ही सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेर्पयत अर्थात दिवसातले दहा तास राहणार असल्यामुळे या ठिकाणी बालकांसाठी पाळणा, लहान खेळणी राहणार आहेत. अंगणवाडी केंद्राच्या परिसरातच ही बालविकास केंद्र राहणार असल्यामुळे स्वच्छतागृहे आणि पाण्याचेही व्यवस्था अशा ठिकाणी उपलब्ध राहणार आहेत. दर आठ दिवसांनी या बालकांचे वजन घेतले जाते.केवळ औपचारिकता नकोग्राम बालविकास केंद्रांची जिल्ह्यात केवळ औपचारिकता राहू नये. गेल्या काही वर्षातील तो अनुभव आहे. अंगणवाडी केंद्रात दिवसभर बालकांना ठेवले जाते. त्यांचे पोषण किती आणि कसे होते हा संशोधनाचा विषय असतो. परंतु कागदपत्र रंगविले जावून सर्वच अलबेल दाखविले जाते.
बालकांपेक्षा पालकांवरच दुप्पट खर्च
By मनोज.आत्माराम.शेलार | Published: August 18, 2017 12:02 PM
कुपोषण मुक्तीचा असाही फंडा : ग्राम बालविकास केंद्रांमधील चित्र
ठळक मुद्दे बालकांवर दिवासाला 55 तर पालकांवर होणार 105 रुपये खर्च जिल्ह्यात 1,674 सॅम बालके 4कुपोषणाच्या दोन श्रेणीनुसार बालकांचे कुपोषणाचे प्रमाण ठरविले जाते. पूर्वी प्रथम, द्वितीय व तृतीय अशी श्रेणी ठरविली जात होती. आता केवळ सॅम आणि मॅम या नुसारच तीव्र व सामान् 78 केंद्रांचे पहिल्या टप्प्यात नियोजन जिल्ह्यात यंदा जवळपास दिडशे ग्राम बालविकास केंद्र सुरू करण्याचे नियोजन आहे. त्यातील पहिल्या टप्प्यात 78 ठिकाणी ही केंद्र सुरू होणार आहेत. या केंद्रांमध्ये सॅम बालकांना 30 दिवस ठेवण्यात येणार आहे. दररोज सकाळी आठ वाजपहिल्या टप्प्यातील 78 केंद्रांना दोन कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली आहे. दुस:या टप्प्यात देखील तेवढीच बालविकास केंद्र मंजुर होण्याची शक्यता आहे. या ठिकाणी आवश्यक त्या सर्व सुविधा ुउपलब्ध राहणार आहेत. -अशोक बागुल, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महि