लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्याला या वर्षात 40 हजार घरकुलांचे उद्दीष्ट असतांना प्रत्यक्षात 34 हजार 514 घरकुलांना मंजुरी देण्यात आलेली आहे. यामुळे अनेकांचे घराचे स्वप्न पुर्ण होणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फत प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण व इतर राज्य पुरस्कृत घरकुल आवास योजना राबविण्यात येत आहे. प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण अंतर्गत 2019-20 मध्ये एकूण 40 हजार 612 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले आहे. त्यापैकी महाराष्ट्र राज्यात नंदुरबार जिल्ह्यात सर्वाधिक 34 हजार 515 घरकुल मंजुरी देण्यात आलेली आहे. तसेच एकूण 11 हजार 946 लाभाथ्र्याना प्रथम हप्ता वितरित करण्यात आलेला आहे. उर्वरित लाभाथ्र्यानाही प्रथम हप्ता वितरित करण्यात येत आहे. या योजनेंतर्गत प्रथम हप्ता वितरित केल्यापासून पुढील एका वर्षार्पयत लाभाथ्र्याने घरकुलाचे कामकाज पूर्ण करण्याचा अवधी असतो. लाभाथ्र्याच्या घरकुलाचा टप्पानिहाय केलेल्या कामकाजानुसार लाभाथ्र्यास अनुदान वितरित करण्यात येत असते.सन 2016-17 ते 2018-19 या तीन वर्षात एकूण 38 हजार 574 घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झालेले असून, त्यापैकी 25 हजार 168 घरकुले पूर्ण करण्यात आलेले आहेत व 13 हजार 406 घरकुले प्रगतीपथावर आहेत. अपूर्ण घरकुले पूर्ण करण्यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीतील अधिका:यांनी लाभार्थी भेट देऊन कामे पूर्ण करण्यासाठी प्रय}शील आहे. 23 मे र्पयत लोकसभा आचार संहिता असतांना सुद्धा घरकुले पूर्ण करण्याची मोहीम सुरूच होती. त्यामुळे चालू आर्थिक वर्षात 120 दिवसात पाच हजार 895 घरे पूर्ण करण्यात आली आहे. म्हणजेच दररोज सरासरी 50 घरे पूर्ण होत आहे. 23 मे नंतर आचार संहिता संपुष्टात आल्यानंतर 2 महिन्यातच कागदपत्रांची पडताळणी करून 34 हजार 515 घरे मंजुर करण्यात आली आहे. म्हणजेच दररोज सरासरी 500 घरे मंजूर करण्यात आली आहे.
1 एप्रिल अर्थात चालू आर्थिक वर्षात 25 हजार 711 लाभाथ्र्याना 62.52 कोटी निधी थेट बँके खात्यात वितरित करण्यात आलेला आहे. तसेच लाभाथ्र्याना अनुदान मिळण्याबाबत कुठल्याही प्रकारची तक्रार असल्यास लाभाथ्र्यानी संबंधित पंचायत समितीतील गटविकास अधिकारी तथा जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा नंदुरबार या कार्यालयाशी संपर्क करावा.