लोकमत न्यूज नेटवर्कलहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे परिसरात पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली आह़े तसेच मोटारीदेखील वीज नसल्याने अल्पकाळ सुरु राहत असल्याने पिकांना पाणी द्यावे कसे अशी विवंचना शेतक:यांसमोर उभी आह़ेपावसाळा सुरु होऊन दोन महिने उलटले असूनही गावातील बहुतेक कुपनलिका, विहीरी कोरडय़ाठाक पडल्या आहेत़ तसेच पाण्याची पातळीही खोल गेली आह़े यामुळे पिकांना जगवावे कस अशी चिंता शेतकरी व्यक्त करीत आहेत़ त्यामुळे कधी एकदा दमदार पाऊस येतो या आशेने शेतक:यांची डोळे आभाळाकडे लागले आहेत़ नंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, शिंदे, कोळदे, पळाशी, खोंडामळी, विखरण, बामडोद, पातोंेडा, पथराई आदी परिसरात पावसाने ब:याच दिवसांपासून तळी मारली आह़े त्यामुळे या परिसरातील शेतकरी चांगलेच चिंताग्रस्त झाले आहेत़ येथील पिकांना जगवणे शेतक:यांना जड जात आह़े दरम्यान, या परिसरात गेल्या दोन महिन्यांपासून तुरळकच पाऊस झाला असून तोही कुठे झाला तर कुठे झालाच नसल्याची स्थिती आह़े त्यामुळे जणू उन्हाळ्याचेच दिवस असल्यासारखी स्थिती विहीरी व कुपनलिकांची झाली आह़े त्यामुळे पिकांना पाणी देण्यासाठी शेतक:यांना मोठी कसरत करावी लागत आह़े विहीरीत पाणी कमी झाले असल्याने शेतकरी विद्युत मोटारी विहीरीत सोडत मिळेल तेवढे पाणी ओढण्याचा प्रयत्न करीत आह़े व या माध्यमातून आपली पिक जगवित आह़े परिसरात मोठय़ा प्रमाणात ऊस, कापूस, ज्वारी, मका आदी पिके घेण्यात आली आह़े यंदा पावसाळा लवकर असल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले होत़े त्यामुळे परिसरातील बहुसंख्य शेतक:यांनी पेरणी केली होती़ परंत त्यानंतर पावसाने पाठ फिरवल्याने अनेक शेतक:यांची पिक पाण्याअभावी जळाली होती़ काही शेतक:यांकडून कर्ज काढून दुबार पेरणी करण्यात आली होती़ आताही बहुतेक शेतक:यांवर तिस:यांदा पेरणी करण्याचे संकट ओढावले आह़े त्यामुळे इकडून-तिकडून कर्ज घेऊन जेमतेम पेरणी, बि-बियानांचा खर्च करुन शेतकरी पिक जगविण्यासाठी धडपड करीत असताना दुसरीकडे मात्र निसर्ग साथ देत नसल्याने शेतक:यांसमोर दुहेरी संकट निर्माण झालेआह़े दरम्यान, येत्या काळात पुन्हा जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला आह़े त्यामुळे हा तरी अंदाज खरा ठरावा अशी अपेक्षा आता शेतक:यांकडून व्यक्त होत आह़े
पाण्याअभावी पिकांची वाढ खुंटली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:56 AM