ऑनलाईन लोकमतदिनांक 18 ऑगस्टनंदुरबार : पावसाअभावी पोळा हा सण दुष्काळाच्या छायेत सापडला असल्याचे चित्र सध्यातरी दिसून येत आह़े परंतु माफक प्रमाणात का होईना बळीराजा शेतातील आपल्या सच्चा साथीदाराच्या कृतज्ञतेपोटी हा सण साजरा करण्यासाठी सज्ज झाली आह़े शेतक:यासोबतच बैल वर्षभर आपल्या मालकाची साथ देत असतो़ त्यामुळे आपल्या या जिवाशिवाच्या साथीदाराच्या उपकाराची जाण ठेवत शेतकरी मोठय़ा उत्साहात पोळा सण साजरा करीत असतात़ परंतु सध्या अर्धा पावसाळा उलटण्यात आला तरीदेखील जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला नसल्याने पोळा साजरा तरी कसा करावा? अशी चिंता आता शेतक:यांना सतावत आह़े यंदा पावसाळा लवकर असल्याने पहिल्या एक-दोन पावसातच शेतक:यांनी पेरणीला सुरुवात केली होती़ परंतु नंतर पावसाने तडी दिल्याने शेतक:यांचा पुरता भ्रमनिरास झाला आह़े कर्ज काढत केलेली पेरणी आता डोईजड होऊ लागली आह़े भरपूर पावसाने उत्पन्नही समाधानकारक असेल अशी शेतक:यांची अपेक्षा होती़ परंतु सर्व अपेक्षांवर पाणी फेरले असल्याच्या व्यथा शेतकरी मांडत आह़े त्यामुळे अशा परिस्थितीत पोळ्यासाठी लागणारा साज-श्रृंगार घ्यावा कसा व हा सण साजरा करावा कसा असा प्रश्न शेतक:यांसमोर उभा ठाकला आह़ेपावसाचे दिवसेंदिवस कमी होणारे प्रमाण तसेच यामुळे निर्माण होणारा दुष्काऴ या आसमानी संकटामुळे शेतक:यांना आपल्या शेतात राब-राब राबणा:या आपल्या साथीदाराला विकावे लागत आह़े त्याच प्रमाणे शेती क्षेत्रामध्ये वाढते आधुनिकीकरण, वाहनांचा वापर यामुळे आधी एका सालदाराकडे असणारी बैलांची दहा जोडी आता मोठय़ा मुश्किलीने एक दिसून येत आह़े त्यामुळेदेखील पूर्वी पारंपारिक पध्दतीने साजरा केला जाणारा हा सण आता काही प्रमाणात लोप पावत आहे की काय अशी भिती व्यक्त होत आह़े एकीकडे दुष्काळ सदृष परिस्थिती तर दुसरीकडे बैलांच्या सजावटीच्या सामानाची वाढती किंमत यामुळे शेतकरी माफक प्रमाणात का होईना परंतु आपली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी सज्ज झाला आह़े
यंदाच्या पोळ्यावर दुष्काळाचे सावट
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: August 18, 2017 12:20 PM
आवश्यक वस्तूंचीच खरेदी : वाढत्या दरांनी साज-साहित्यांचीही मागणी घटली
ठळक मुद्देसाहित्यांच्या किमतीतही झाली वाढ पोळा सण म्हटला म्हणजे शेतकरी आपल्या बैलाला आकर्षक पध्दतीने सजवत असतात़ यात विविध पारंपारिक पध्दतीच्या साहित्यांचा वापर करुन आपल्या जिवाभावाच्या साथीदाराला देखने रुप देत असतात़ परंतु सध्या या साहित्यांच्या किंमतीदेखील वाढल