लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : पावसाची सुरु असलेली रिपरिप आणि ढगाळ वातावरण यामुळे नंदुरबार बाजार समितीत कापसासह धान्य आणि कडधान्य उत्पादनाची खरेदी बंद आह़े ओलाव्यामुळे माल सुकवण्यासाठी जागा नसल्याने 1 नोव्हेंबरपासून मालाची खरेदी सुरु करण्याची परवानगी देण्याची मागणी व्यापा:यांनी बाजार समितीकडे पत्राद्वारे केली आह़े जिल्ह्यात साधारण ऑक्टोबर महिन्यात कापूस व इतर खरीप उत्पादने बाजारात येत असल्याने व्यापा:यांकडून तातडीने खरेदी सुरु होत़े यंदा पावसाने मुक्काम वाढवल्याने बोंड फूटून बाहेर आलेला कापूस ओलाव्यामुळे शेताबाहेर आला नव्हता़ वेचणी झालेल्या कापसात ओलावा (मॉईश्चर) 40 टक्के असल्याचे कारण देत व्यापारी हात लावत नव्हत़े यातून शुक्रवारपासून 25 ऑक्टोबरपासून नंदुरबार बाजार समिती खरेदी विक्रीचे व्यवहार दिवाळीमुळे बंद करण्यात आले होत़े परंतू आता या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे व्यापा:यांनी खरेदी केलेली ज्वारी, बाजरी, मका यासह विविध कडधान्य हे ओले होऊन सुकवण्यासाठी आवारात टाकले गेले आह़े यामुळे नवीन माल खरेदी करुन ठेवण्यासाठी किंवा सुकवण्यासाठी जागा नसल्याने 1 नोव्हेंबरपासून धान्य खरेदीसाठी परवानगी देण्याचे पत्र ग्रेन र्मचट असोसिएशनने नंदुरबार बाजार समितीला दिले आह़े जिल्ह्यावर सध्या अवकाळी भीज पाऊस ठरावित कालावधीत कोसळत आह़े यातून पिकांचे तसेच शेतातून काढणी केलेल्या धान्याचे नुकसान होत आह़े पावसामुळे धान्य खराब होऊन मालाची प्रत कमी होत आह़े एकीकडे धान्याची गंभीर स्थिती असताना दुसरीकडे कापूस खरेदी करण्यासाठी व्यापारीही असल्याची माहिती आह़े परंतू पाऊस थांबत नसल्याने कापसात ओलावा येऊन बाजारात मिळणारे दर कमी होण्याची शक्यता आह़े
पावसाच्या हजेरीमुळे कापसासह धान्य व कडधान्य पिकांची खरेदी थांबली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2019 12:24 PM