३० वर्षांच्या विकासाच्या स्वप्नांना आकार देण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2020 12:28 PM2020-01-04T12:28:13+5:302020-01-04T12:28:21+5:30
रमांकात पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : आमदार म्हणून गेल्या ३० वर्षांपासून आपण या भागाचे प्रतिनिधित्त्व करीत असून ...
रमांकात पाटील ।
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : आमदार म्हणून गेल्या ३० वर्षांपासून आपण या भागाचे प्रतिनिधित्त्व करीत असून या काळात विकासाच्या योजनांचा पाठपुरावा करुन आपल्या कामाला प्रामाणिकपणे न्याय दिला आहे़ आता मंत्रीपद मिळाल्याने कामाची कक्षा रुंंदावली असून त्याचा जनसेवेसाठी पूरेपूर प्रयत्न करु अशी ग्वाही मंत्री अॅडक़े़सी़पाडवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़
अॅड़ के़सी़पाडवी हे १९९० पासून आमदार म्हणून सातपुड्याचे प्रतिनिधित्त्व करीत आहेत़ या काळात त्यांना मंत्रीपदाचीही संधी चालून आल्या़ १९९५ मध्ये तत्त्कालीन युती शासनात त्यांना मंत्रीपदाची आॅफर होती़ परंतू तत्त्व आणि विचारधारेची सबब पुढे करुन त्यांनी त्यावेळी मंत्रीपद नाकारले होते़ पुढे आघाडी शासनाच्या काळातही ज्येष्ठतेला योग्य न्याय मिळाला नसल्याने त्यांनी राज्यमंत्रीपद नाकारले होते़ या पार्श्वभूमीवर नुकतेच सत्तेवर आलेल्या शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाविकास आघाडीच्या शासनात कॅबिनेट मंत्रीपद मिळाले आहे़
अद्याप खातेवाटप झाले नसले तरी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर शुक्रवारी प्रथमच ते जिल्ह्यात आले़ यावेळी त्यांची भेट घेतली असता, ते विविध प्रश्नांवर बोलताना म्हणाले की, विधीमंडळाच्या आपल्याला ३० वर्षाचा अनुभव आहे़ त्यामुळे केवळ सातपुडा आणि जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जनतेच्या प्रश्नांची आपणाला जाण आहे़ विशेषत: आदिवासींचे विविध प्रश्न आपण जाणून आहेत़ हे प्रश्न सोडवण्यासाठी आपण सातत्याने विधीमंडळात पाठपुरावा करीत आलो, काही प्रश्नांबाबत थेट दिल्लीतही आंदोलने केली़ त्यातून काही प्रश्न मार्गी लागले़ काही सुटू शकले नाहीत, काहींच्या बाबतीत मनासारखा न्याय मिळाला नाही ही खंत निश्चितच आमदार असताना आपल्या मनात होती़ आणि आजही आहे़ आता मंत्रीपद मिळाल्याने त्यांच्या व्यापकतेने विचार करता येईल व विकासाचे प्रश्नही मार्गी लावण्यास मदत मिळेल़
जिल्ह्यातील प्रश्नांसदर्भात ते म्हणाले सातपुड्यातील वनगावे, वनजमीनीचा प्रश्न, स्थलांतराचे प्रश्न, सिंचनाचे प्रश्न, उद्योग संदर्भातील प्रश्न आपण नेहमी मांडले आहेत़ त्यासदंर्भात काय झाले पाहिजे त्याचीही मनात एक संकल्पना तयार केली आहे़ ही संकल्पना साकारण्यासाठी आपले निश्चितच प्राधान्य राहिल़ मतदारासंघातील दरा आणि आंबाबारी या मध्यप्रकल्पांचे रखडलेले काम, रहाट्यावड धरणाचे काम मार्गी लावणे, तापीवरील उपसा योजना, जिल्ह्यातील दळणवळणाचा प्रश्न, पर्यावरणाचा प्रश्न या कामांनाही प्राधान्य राहिल़
खातेवाटप अद्याप झालेले नाही़ आपल्याला कुठले खाते द्यावे हे मुख्यमंत्री ठरवतील, पण ज्याही खात्याचे काम मिळेल त्याला पुरेपूर न्याय देण्यासाठी आपले प्रयत्न राहतील़ आपल्याला मिळालेली ही संधी लोकसेवेसाठीच पणाला लावू असेही त्यांनी सांगितले़