नोज शेलार ।नंदुरबार : जगातून उच्चाटन होत असलेल्या हत्तीपायरोगाचा मुक्काम नंदुरबार जिल्ह्यात मात्र कायम आहे. जिल्ह्यात एकुण ३१ रुग्ण असून अक्कलकुवा तालुका वगळता सर्वच तालुक्यांमध्ये या रोगाचे रुग्ण आढळून आले आहेत. शासनाची तपासणी व औषधोपचार मोहिम केवळ नवापूर व तळोदा तालुक्यापुरतीच मर्यादीत ठेवण्यात आलेली आहे.अफ्रिकन देशांमध्ये सर्वाधिक संख्येने आढळून येणाऱ्या हत्तीपाय रोगाचे रुग्ण भारतात देखील पूर्वोत्तर राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. राज्यात नवापूर तालुक्यात देखील या रोगाचे रुग्ण पूर्वी मोठ्या प्रमाणावर होते. दुरीकरण मोहिमेअंतर्गत गेल्या दहा वर्षात या रोगावर बऱ्यापैकी नियंत्रण मिळविण्यात आले असले तरी पूर्वी केवळ नवापूर तालुका प्रभावीत असतांना पाच वर्षात मात्र अक्कलकुवा वगळता संपुर्ण तालुक्यांमध्येच या रोगाचे रुग्ण आढळून आले आहेत.कशामुळे होतो हा रोगहत्तीरोग हा सुतासारख्या दिसणाºया कृमीमुळे (मायक्रोफायलेरिया) होणार आजार आहे. या रोगामुळे कायमचे अपंगत्व किंवा अवयवास सूज, विद्रूपता येऊ शकते. हत्तीरोगाचा प्रसार ‘क्यूलेक्स क्विंकीफेशिएटस्’ या डासांमुळे होतो. रोगाचा जंतूचा शरिरात प्रवेश झाल्यावर आठ ते १८ महिन्यानंतर कधीही अंगावर खाज येणे, पूरळ उठणे, वारंवार ताप येणे आदी लक्षणे दिसतात. हातापायावर टणक सूज येणे, अंडवृद्धी, जननेंद्रियावर सूज येऊन वेदना होतात.या रोगाच्या डासांचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून घर व परिसरातील पाण्याची डबकी बुजवावी, पाणी वाहते करावे व त्यावर रॉकेल, निरुपयोगी आॅईल टाकावे त्यामुळे क्यूलेक्स डासांचे नियंत्रण होते. शौचालयाच्या सेप्टीक टँकचे ढापे झाकण निट बसवावे.जिल्ह्यात या रोगाचा फैलाव रोखण्यासाठी एक दिवशीय औषधोपचार मोहिम दरवर्षी डिसेंबर दरम्यान राबविण्यात येते. दोन वर्षापेक्षा अधीक वयोगटातील प्रत्येकाला हा औषधोपचार करण्यात येतो.दुरीकरण मोहीम नावालाचया रोगाचे समुळ उच्चाटन करण्यासाठी राष्टÑीय हत्तीरोग दुरीकरण कार्यक्रम गेल्या दहा वर्षांपासून जाहीर करण्यात आला आहे. परंतु दुरीकरण तर दूरच पूर्वी केवळ नवापूर तालुक्यात आढळणारा हा आजार आता जिल्हाभरात आढळून येत आहे.
नंदुरबार जिल्ह्यात हत्तीपाय रोगाचा मुक्काम कायमच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 11:45 AM