अतिक्रमणामुळे शहाद्यात अपघात वाढले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:28 AM2021-09-13T04:28:36+5:302021-09-13T04:28:36+5:30

शहादा नगरपालिका प्रशासनाकडून गेल्या दोन महिन्यांपूर्वी शहरातील जुन्या पोलीस मुख्य कार्यालयापासून भगवा चौक, दोंडाईचा रोड, महात्मा जोतिबा फुले चौक ...

The encroachment increased the number of accidents in Shahada | अतिक्रमणामुळे शहाद्यात अपघात वाढले

अतिक्रमणामुळे शहाद्यात अपघात वाढले

googlenewsNext

शहादा नगरपालिका प्रशासनाकडून गेल्या दोन महिन्यांपूर्वी शहरातील जुन्या पोलीस मुख्य कार्यालयापासून भगवा चौक, दोंडाईचा रोड, महात्मा जोतिबा फुले चौक ते महाराणा प्रताप चौक तसेच डोंगरगाव रस्त्यावरील खेतिया चार रस्ता ते पाडळदा चौफुली दरम्यान व जनता चौक ते कुकडेल भवानी चौक दरम्यान असलेल्या टपऱ्या व अतिक्रमण हटवण्यात आले होते. मात्र दोन महिन्यांत हे अतिक्रमण पुन्हा ‘जैसे थे’ झाले आहे. या अतिक्रमणामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून वारंवार अपघात होत आहेत. शनिवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास तुरळक पाऊस झाला होता. गणेशोत्सव सुरू असल्याने रस्त्यावर गर्दी होती. जुन्या मोहिदा रस्त्यावरील गुरुमाऊली ट्रेडर्ससमोर लोकांना वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने व्हॅन (क्रमांक एमएच ३९ जी-१६८८) विजेच्या खांबावर जाऊन आदळली. या अपघातात जीवितहानी झाली नसली तरी व्हॅनचे मोठे नुकसान झाले आहे. १५ दिवसांत हा दुसरा अपघात झाला आहे.

रस्त्याच्या दुतर्फा झालेल्या अतिक्रमणामुळे रस्ता अरुंद झाला आहे. त्यातच हातगाडीवर भाजीपाला, फळे व इतर वस्तू विक्रेत्यांनी कहरच केला आहे. भविष्यात मोठी दुर्घटना होऊ नये यासाठी पालिकेने हे अतिक्रमण हटविण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Web Title: The encroachment increased the number of accidents in Shahada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.