प्रकाशा : पर्यावरणाचा विचार करून दरवर्षी प्रकाशा येथील संत नरहरी सोनार मंडळातर्फे शाडू अथवा शेतातील मातीपासून ‘श्रीं’ची मूर्ती तयार करण्यात येते. गेल्या चार वर्षांपासून मंडळाचे कार्यकर्ते स्वतः गणेशमूर्ती साकारण्यासाठी परिश्रम घेत असतात.
गणेशमूर्ती तयार करण्यासाठी मंडळातील सदस्य मनोज सोनार, आश्विन सोनार, दर्शन सोनार, गणेश सोनार हे परिश्रम घेतात, तर रंग व अलंकारांचे काम ज्येष्ठ समाजसेवक बाळकृष्ण सोनारी करतात.
दरम्यान, मंडळातर्फे गोळा करण्यात आलेल्या निधीतून दरवर्षी गणेशमूर्तीला चांदीचा एक -एक भाग तयार करून लावीत आहे. या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे गणपतीची विसर्जन मिरवणूक काढताना ढोलताशाचा वापर करीत नाहीत. या मिरवणुकीत महिलादेखील सहभागी होत असतात. विसर्जन मिरवणुकीचा रथ भाविक ओढत विसर्जनाला नेत असतात. गणेशोत्सव कालावधीत या मंडळातर्फे सामाजिक जागृती करण्यात येत असल्याचे मंडळाचे अध्यक्ष दर्शन सोनार यांनी सांगितले. या मंडळात उपाध्यक्ष लखन सोनार, सदस्य किशोर सोनार, संदीप सोनार, मनोज सोनार, विवेक सोनार, संतोष सोनार, सचिन सोनार, रूपेश सोनार, कल्पेश सोनार, आदित्य सोनार, विनोद ठाकणे, शत्रूघ्न माळीच, वैभव सोनार आदींचा समावेश आहे.