जिल्ह्यातील प्रत्येक शेतकऱ्याला पीक कर्ज मिळवून देणार : खासदार डाॅ. हीना गावित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2021 04:22 AM2021-07-18T04:22:29+5:302021-07-18T04:22:29+5:30
पुढे त्या म्हणाल्या, जिल्ह्यात आवास योजनेतील गैरव्यवहाराची तक्रार केली होती. ६९ गावे व ६१ ग्रामपंचायतींमध्ये घरकुलांबाबत अनियमितता होती. केंद्र ...
पुढे त्या म्हणाल्या, जिल्ह्यात आवास योजनेतील गैरव्यवहाराची तक्रार केली होती. ६९ गावे व ६१ ग्रामपंचायतींमध्ये घरकुलांबाबत अनियमितता होती. केंद्र शासनाने यासाठी प्राथमिक चाैकशीचे एक पथक नियुक्त करून पाठवले होते. त्यातून २८ हजार घरकुलांची चाैकशी करण्यात आली. यात ३ हजार १९३ घरकुले हे बोगस असल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यांची चाैकशी सुरू आहे. आवास योजनेच्या लाभार्थींचे मनरेगाचे पैसेही कापले गेले त्याकडेही केंद्र शासनाचे लक्ष वेधले आहे. घरकुलांसोबतच जिल्ह्यात गोठे, विहिरी आणि शाैचालये यातही गैरप्रकार झाल्याचा दावा शेवटी खासदार डाॅ. गावित यांनी केला.
दरम्यान, जिल्ह्यासाठी मंजूर झालेले वैद्यकीय महाविद्यालय हे आमदार डाॅ. विजयकुमार गावित यांची संकल्पना होती. हे वैद्यकीय महाविद्यालय सुरू व्हावे यासाठी आमदार डाॅ. गावित व आपण सातत्याने पाठपुरावा करत आलो आहोत. मंजूर करण्यात आलेला निधी हा आपल्या पाठपुराव्याने आला आहे. पालकमंत्री ॲड. के. सी. पाडवी हे त्याचे श्रेय घेत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केली.