शिबिराच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील होते. यावेळी गंगोत्री फाउंडेशनचे अध्यक्ष अभिजित पाटील, तालुका एज्युकेशन सोसायटीचे व्हा. चेअरमन हिरालाल पाटील, संचालक डॉ. सखाराम चौधरी, प्रकाश पाटील, विठ्ठल पाटील, शरद पाटील, दत्तू पाटील, म्हसावदचे हिरालाल पाटील, नामदेव पटले, दगडू पाटील, नरेंद्रकुमार शहा, दिनेश पाटील, अनिल पाटील, शिवाजी पाटील, रमेश चौधरी, यशवंत पाटील, नगरसेवक आनंदा पाटील, संदीप पाटील, संजय साठे, संतोष वाल्हे, गंगोत्री फाउंडेशन सचिव जयदेव पाटील, प्रीती पाटील, मानद सचिव विश्वनाथ पाटील, प्राचार्य आय.डी. पटेल, प्राचार्य डॉ. शांताराम बडगुजर, प्राचार्य संजय पाटील, प्रा. अनिल पाटील आदी उपस्थित होते.
यावेळी नगराध्यक्ष मोतीलाल पाटील म्हणाले की, आजच्या दगदगीच्या जीवनामध्ये आरोग्याकडे दुर्लक्ष होत चालले आहे. विशेषत: बदलत्या जीवनशैलीमुळे ऐन तारुण्यात तरुणांनाही विविध आजारांनी ग्रासले आहे. तपासणी व औषधोपचाराचा खर्च जास्त येत असल्याने नागरिक होणाऱ्या त्रासाकडे दुर्लक्ष करतात. विविध आजारांनी त्रस्त असलेल्या सर्वसामान्य नागरिकांवर आरोग्य शिबिरातून वेळीच औषधोपचार करून दिलासा देण्याचे काम गंगोत्री फाउंडेशनमार्फत होत आहे, असे सांगितले.
शिबिरात सुरत येथील डॉ. हर्षल मिस्त्री, डॉ. गोवर्धन नकुम, डॉ. मेहूल जालोंधरा, डॉ. अमृत अहिर यांच्या टीमने कॅन्सर निदान व सर्जरी, न्यूरो सर्जन, प्लास्टिक सर्जरी, बाल चिकित्सा सर्जरी, अनोरेक्टल सर्जरी, जनरल सर्जरी याबाबत माहिती दिली व रुग्णांची तपासणी करून औषधोपचार केले. सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले. शिबिरासाठी शिक्षक, कर्मचारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.