कंटेनरमधून गोधनाची तस्करी उघड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 11:45 AM2019-06-07T11:45:15+5:302019-06-07T11:52:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क खेतिया : कंटेनरमध्ये भरून गोधनाची तस्करीचा प्रकार खेतिया येथील सामाजिक कार्यकत्र्यानी नुकताच उधळून लावला. मध्यप्रदेशातून महाराष्ट्राच्या ...
लोकमत न्यूज नेटवर्क
खेतिया : कंटेनरमध्ये भरून गोधनाची तस्करीचा प्रकार खेतिया येथील सामाजिक कार्यकत्र्यानी नुकताच उधळून लावला. मध्यप्रदेशातून महाराष्ट्राच्या दिशेने हा कंटेनर जात होता. दरम्यान, कारवाईच्या वेळी चालक व क्लिनर तेथून पसार झाले.
सेंधवाकडून वळण रस्त्याने महाराष्ट्राच्या हद्दीत जाणा:या संशयीत कंटेनरला खेतिया येथील अतुल निकुम, अनिल सोनिस, अतुल जाधव, संदीप पाटील, शुभम पाटील, दिनेश सोनिस, विजय चौधरी, रवींद्र जगताप, जगदीश चौधरी यांनी पाठलाग करून अडविले. कंटेनरची तपासणी केली असता त्यात दोन कप्प्यात तब्बल 53 गायी, वासरू व बैल निर्दयीपणे कोंबण्यात आलेले होते.
वाहनाची अधिक तपासणी केली असता त्यात वेगवेगळ्या नंबरच्या दोन नंबर प्लेट देखील आढळल्या. याचा अर्थ मध्यप्रदेश, राजस्थानात वेगळी व महाराष्ट्रात वेगळी नंबर प्लेट लावून गोधनाची तस्करी केली जात असल्याचा संशय आहे. सर्व गोधनाला निसरपूर येथील श्रीकृष्ण गोशाळेत दाखल करण्यात आले आहे.
पोलिसांनी कंटेनर ताब्यात घेतले असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फरार चालक व क्लिनरचा तपास केला जात आहे. तपास पोलीस निरीक्षक लक्ष्मीनारायण मालवीय, उपनिरिक्षक अजमेरसिंह अलावा, उपनिरीक्षक नितीन अहिराव व त्यांचे सहकारी करीत आहेत.
दरम्यान, राजस्थान, मध्यप्रदेशमार्गे महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणावर गोधनाची तस्करी करण्यात येत असल्याचे प्रकार वेळोवेळी उघड झाले आहेत. अशी वाहतूक करणारी वाहने प्रत्येक राज्यात त्या त्या राज्यातील नंबर प्लेट लावून दिशाभूल करण्याचा प्रय} करीत असतात. गेल्या वर्षी देखील असाच प्रकार गोरक्षकांनी उघड केला होता.