बोरद परिसरात खतांअभावी शेतकरी चिंतातूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:45 PM2018-07-06T12:45:56+5:302018-07-06T12:46:01+5:30

शेतक:यांच्या व्यथा : प्रशासनाने ठोस भूमिका घेण्याची अपेक्षा

Farmers anxious to eat fertilizer in Borod area due to fertilizer | बोरद परिसरात खतांअभावी शेतकरी चिंतातूर

बोरद परिसरात खतांअभावी शेतकरी चिंतातूर

Next

बोरद : गेल्या काही दिवसांपासून बोरद शिवारासह तळोदा तालुक्यात रिमङिाम पावसाने हजेरी लावली असल्याने बळीराजामध्ये उत्साह संचारला आह़े परिसरातील शेतक:यांकडून खरिप हंगामातील पेरणी करण्यात येत आह़े परंतु युरीया खताची टंचाई जाणवत असल्याने शेतक:यांकडून काहीशी नाराजी व्यक्त करण्यात येत आह़े
पावसाने हजेरी लावली असल्याने साहजिकच बोरद परिसरातील शेतक:यांकडून शेती कामांना वेग देण्यात आला आह़े गेल्या 10 ते 12 दिवसांपासून कापूस, केळी, ऊस आदी पिकांची लागवड करण्यात येत आह़े तसेच सोयाबीन, ज्वारी आदी पिके ब:यापैकी घेण्यात येत आहेत़ बळीराजाला पावसाची साथ असली तरी, काही प्रमाणात युरीयाची कमतरता जाणवत असल्याने पीक जगवावी कशी? असा प्रश्न आता विचारण्यात येत आह़े लगतच्या गुजरात राज्यात युरीयाची उपलब्धता असताना सिमेलगत असलेल्या नंदुरबारात खतांचा तुटवडा कसा जाणवतो असा प्रश्न येथील शेतक:यांना पडला आह़े जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार रावल यांनी खरिप हंगामासाठी खतांचा आढावा घेतला होता़ या वेळी खतांचा             तुटवडा जाणवू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी बैठकीत दिले होत़े परंतु तरीसुध्दा खतांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकरी चिंतातूर आहेत़
सध्या पिकांसाठी पोषक पाऊस पडत असला तरी खतांअभावी पिके जगविण्याची तारेवरची कसरत शेतक:यांना करावी लागणार असल्याचे चित्र दिसून येत आह़े
 

Web Title: Farmers anxious to eat fertilizer in Borod area due to fertilizer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.