बोरद : गेल्या काही दिवसांपासून बोरद शिवारासह तळोदा तालुक्यात रिमङिाम पावसाने हजेरी लावली असल्याने बळीराजामध्ये उत्साह संचारला आह़े परिसरातील शेतक:यांकडून खरिप हंगामातील पेरणी करण्यात येत आह़े परंतु युरीया खताची टंचाई जाणवत असल्याने शेतक:यांकडून काहीशी नाराजी व्यक्त करण्यात येत आह़ेपावसाने हजेरी लावली असल्याने साहजिकच बोरद परिसरातील शेतक:यांकडून शेती कामांना वेग देण्यात आला आह़े गेल्या 10 ते 12 दिवसांपासून कापूस, केळी, ऊस आदी पिकांची लागवड करण्यात येत आह़े तसेच सोयाबीन, ज्वारी आदी पिके ब:यापैकी घेण्यात येत आहेत़ बळीराजाला पावसाची साथ असली तरी, काही प्रमाणात युरीयाची कमतरता जाणवत असल्याने पीक जगवावी कशी? असा प्रश्न आता विचारण्यात येत आह़े लगतच्या गुजरात राज्यात युरीयाची उपलब्धता असताना सिमेलगत असलेल्या नंदुरबारात खतांचा तुटवडा कसा जाणवतो असा प्रश्न येथील शेतक:यांना पडला आह़े जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत पालकमंत्री जयकुमार रावल यांनी खरिप हंगामासाठी खतांचा आढावा घेतला होता़ या वेळी खतांचा तुटवडा जाणवू देणार नसल्याचे आश्वासन त्यांनी बैठकीत दिले होत़े परंतु तरीसुध्दा खतांचा तुटवडा जाणवत असल्याने शेतकरी चिंतातूर आहेत़सध्या पिकांसाठी पोषक पाऊस पडत असला तरी खतांअभावी पिके जगविण्याची तारेवरची कसरत शेतक:यांना करावी लागणार असल्याचे चित्र दिसून येत आह़े
बोरद परिसरात खतांअभावी शेतकरी चिंतातूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2018 12:45 PM