तळोदा तालुक्यात शेतकरी मेळावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:28 AM2021-09-13T04:28:58+5:302021-09-13T04:28:58+5:30
प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी शांतीलाल बावा यांनी केले. या वेळी मोड येथील मेळाव्यात खासदार डॉ. हीना गावीत यांनी सांगितले की, ...
प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी शांतीलाल बावा यांनी केले. या वेळी मोड येथील मेळाव्यात खासदार डॉ. हीना गावीत यांनी सांगितले की, जिल्ह्यात २ लाख शेतकरी असून, १ लाख ६६ हजार शेतकरी शेती करतात. आतापर्यंत जिल्ह्यात फक्त १७ हजार शेतकऱ्यांनी कर्ज घेतले आहे. त्यात प्रत्येक शेतकऱ्याने बँकेतूनच कर्ज घ्यावे आणि सावकाराच्या जाळ्यातून मुक्त होण्याचे आवाहन त्यांनी केले. तसेच किसान क्रेडिट कार्ड काढून दोन एकर जमिनीवरही १ लाख ६० हजारांचे कर्ज बँक देते तेही बिन व्याजी असते. त्यामुळे बॅकांमधूनच कर्ज घेण्याचे आवाहन त्यांनी शेतकऱ्यांना केले. तसेच जोडधंद्यासाठी मिळणाऱ्या योजनेतील कर्जबाबतदेखील सविस्तर माहिती दिली. याप्रसंगी आमदार डॉ. विजयकुमार गावीत यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. या मेळाव्यास तलाठी, ग्रामसेवक, कृषी अधिकारी, बँक अधिकारी, शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.