शहाद्यातील शेतक:यांना मिळतोय ‘ति’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 11:40 AM2017-09-13T11:40:35+5:302017-09-13T11:40:35+5:30

उपक्रम : युवतीकडून निशुल्क भरले जाताय कृषी सन्मान योजनेचे अजर्

 Farmers of Shahadya: The basis of 'TI' | शहाद्यातील शेतक:यांना मिळतोय ‘ति’चा आधार

शहाद्यातील शेतक:यांना मिळतोय ‘ति’चा आधार

Next


लोकमत न्यूज नेटवर्क
बामखेडा : कजर्माफीसाठी सर्वत्र शेतक:यांची अर्ज भरण्यासाठी लगबग सुरु आह़े परंतु अर्ज भरण्याच्या नावाने करण्यात येत असलेली लुट तसेच ऑनलाईन अर्ज भरताना ‘सव्र्हर’ डाऊनमुळे शेक:यांसमोर नवी समस्या निर्माण होत आह़े परंतु यात सर्वात खर्दे ता़ शिरपुर येथील युवती श्वेता गुजर हीचा शेतक:यांना काहीसा आधार वाटत आह़े
या युवतीकडून गावोगावी जात शेतक:यांना छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेअंतर्गत असलेले अर्ज भरुन देण्यात येत आह़े श्वेता सध्या शहादा तालुक्यातील हिंगणी येथे लाभार्थी शेतक:यांना निशुल्क अर्ज भरुन देत आह़े तिने आतार्पयत शिरपुर तालुक्यातील आमोद, उटावद, खर्दे या गावातील शेकडो लाभाथ्र्याचे अर्ज भरले आह़े हिंगणी येथेदेखील तिने सुमारे शंभरावर अर्ज भरुन दिले असल्याचे सांगण्यात आल़े परिसरातील शेतक:यांकडूनही तिला चांगला प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आह़े अर्ज भरण्याची मुदत 15 सप्टेंबर्पयत आह़े या काळात अर्ज भरणे अनिवार्य असल्याने लाभार्थी शेतक:यांकडूनही लगबग सुरु झाली आह़े
अर्ज भरण्यासाठी शेतक:यांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आह़े एकतर, बहुसंख्येने शेतकरी हा अर्ज दाखल करीत असल्याने संबंधित संकेतस्थळावर सव्र्हर डाऊनची नेहमीच समस्या होत असत़े त्याच प्रमाणे शेतकरी खाजगी ठिकाणाहून अर्ज भरीत असल्यास त्यांच्याकडून शंभर ते दोनशे रुपये घेण्यात येत असतात़ त्यामुळे शेतक:यांची यातून आर्थिक पळवणूकही होत असल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे या तरुणीकडून हाती घेण्यात आलेल्या उपक्रमाचे कौतुक करण्यात येत आह़े

Web Title:  Farmers of Shahadya: The basis of 'TI'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.