लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : विविध मागण्यांसाठी रेल्वे रोको आंदोलनाकरीता स्थानकात आगेकूच करणा:या प्रहार संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकत्र्याना पोलिसांनी रोखल्याने गोंधळ उडाला. यावेळी संतप्त आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी करीत आंदोलनासाठी स्थानकात प्रवेश करू देण्याची मागणी केली. आंदोलक व पोलिसांमध्ये शाब्दिक चकमक उडाल्यानंतर तहसीलदार भाऊसाहेब थोरात आंदोलन स्थळी दाखल झाले. लेखी आश्वासन दिल्याने आंदोलक माघारी परतले.आमदार बच्चू कडू यांच्या प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने शेतक:यांच्या विविध मागण्यांसाठी जिल्हाधिका:यांना निवेदन सादर करण्यात आले होते. परंतु अपेक्षित निर्णय होऊ न शकल्यामुळे पदाधिकारी व कार्यकत्र्यांनी रेल रोको आंदोलनाचा इशारा दिला होता.गुरुवार 6 जून रोजी संघटनेचे जिल्हाभरातील पदाधिकारी व कार्यकर्ते सकाळी 10 वाजता रेल्वे स्थानक परिसरात एकत्र आल्यानंतर 11 वाजेच्या सुमारास रेल्वेरोको साठी स्टेशन च्या आत जाण्यासाठी निघाले मात्र, पूवीर्पासून बंदोबस्तावर असलेल्या रेल्वे सुरक्षा बल, लोहमार्ग पोलीस ठाणे तसेच शहर पोलीस ठाण्यातील पोलिसांनी त्यांना रोखले.पोलिसांनी आंदोलकांना रोखल्यानंतर रेल्वे रोको साठी स्थानकात जाऊ देण्याच्या मागणीसाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलक व पोलिसांमध्ये काही काळ शाब्दिक चकमकही झाली. उपविभागीय पोलिस अधिकारी रमेश पवार, सहाय्यक सुरक्षा आयुक्त राकेश पांडे यांनी आंदोलकांची समजूत घालण्याचा प्रय} केला.परंतु आंदोलक समजण्याच्या मनस्थितीत नव्हते. शेतकरी मागण्यांवर ठाम होते. महसूल प्रशासनातील अधिका:यांना चर्चेसाठी बोलावण्याची मागणी लावून धरली त्यानुसार तहसीलदार भाऊसाहेब थोरात आंदोलन स्थळी दाखल झाले.आंदोलकांशीे चर्चातहसीलदार थोरात यांनी प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील व पदाधिकारी, कार्यकत्र्यांशी चर्चा केली. शासनाने दुष्काळ जाहीर करूनही दुष्काळ निधी अत्यल्प असल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी, शेतमजूर व सुशिक्षित बेरोजगारांची चेष्टा झाल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. 16 जूनला बैठकतहसीलदार भाऊसाहेब थोरात यांनी आंदोलकांचे म्हणणे ऐकून घेत. संबंधित अधिका:यांशी चर्चा करून तोडगा काढण्यात येणार असल्याचे लेखी पत्र आंदोलकांना दिले. त्यानंतर आंदोलक माघारी परतले. आंदोलनात जिल्हाध्यक्ष बिपीन पाटील, गजानन वसावे, सुनील पाटील, रघुनाथ पाटील, महादेव पाटील, महेंद्र बोरसे ,सचिन महाले, योगेश बोरसे, प्रमोद पाटील, राजेंद्र सैंदाणे, सुदाम वरसाडे, रमेश पाटील, उदयसिंह राजपूत, वेडू पाटील, संजय पाटील, किशोर पाटील, रोत्या पाडवी, रवींद्र वळवी आदींसह शेकडो शेतकरी सहभागी झाले होते. प्रत्येक शेतक:याला कर्जमाफीचा लाभ मिळावा. खरीप व रब्बी हंगामासाठी कर्ज उपलब्ध करून द्यावे. सुशिक्षित बेरोजगारांना उद्योग व्यवसायासाठी कर्ज पुरवठ्याची अंमलबजावणी तातडीने करावी.4चारा छावण्या तात्काळ सुरु कराव्यात. कांदा उत्पादक शेतक:यांना अनुदाना पासून वंचित ठेवणा:यांवर कारवाई करावी.प्रहार शेतकरी संघटनेच्यावतीने रेल्वे रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची पूर्वकल्पना असल्यामुळे लोहमार्ग पोलीस स्टेशन, रेल्वे सुरक्षा बल व शहर पोलिसांच्या पथकाने सकाळपासूनच फौजफाटा तैनात केला होता. रेल्वेस्थानकाच्या प्रवेशद्वाराजवळ व मागील बाजूस तसेच ठिकठिकाणी पोलीस मोठ्या संख्येने तैनात होते. यामुळे रेल्वे प्रवासी आणि परिसरातील व्यवसायिकांमध्ये कुतूहल निर्माण झाले होते.
शेतक:यांचे रेल्वेरोको आंदोलन टळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 07, 2019 11:40 AM