संतोष सूर्यवंशी । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : सध्या पितृपक्ष सुरु असल्याने याचा फटका एसटी महामंडळाला बसताना दिसून येत आह़े जिल्ह्यातील सुमारे 16 एसटी बसेसचे शेडय़ुल व 6 हजार किलोमीटरच्या बसफे:या रद्द करण्यात आल्या आहेत़ अनंत चतुर्दशीच्या दुस:या दिवसापासून साधारणत पितृपक्षाला सुरुवात होत असत़े आपल्या भारतीय संस्कृतित पितृपक्षाचे स्थान अनन्यसाधारण असत़े सामान्य रुढी-परंपरेप्रमाणे या दिवसांमध्ये घराण्यातील पुर्वजांना गोड-धोड नैवद्य दाखविला जात असतो़ परंतु या कालावधीला काहींकडून अशुभ मानण्यात येत असत़े त्यामुळे यात, लगAसमारंभ, शुभकार्य, पवित्र, धार्मिक कामे, खरेदी व्यवहार आदी करणे टाळण्यात येत असत़े त्यामुळे याचा फटका एसटी महामंडळालाही बसताना दिसून येत आह़े पितृपक्षात शुभकार्य, खरेदी विक्री व्यवहार करण्यात येत नसल्याने सध्या एसटी बससेमध्ये प्रवाशांची गळती लागली आह़े त्यामुळे एसटी प्रशासनाकडून पितृपक्षाच्या कालावधीसाठी कमी भारमान असलेल्या एसटी बसफे:या व शेडय़ुल बंद करण्यात आले आह़े नवापूर आगाराकडून नवापूर-जळगाव, नवापूर-धुळे, नवापूर-नाशिक, नवापूर-शिरपूर, नवापूर- जळगाव, नवापूर सुरत असे एकूण 5 शेडय़ुल व 2 हजार 430 किमीच्या बसफे:या रद्द केल्या आहेत़ शहादा आगाराकडून शहादा-धुळे-जळगाव, शहादा-नाशिक, शहादा-धडगाव असे एकूण 3 शेडय़ुलच्या 1 हजार 210 किमीच्या बसफे:या रद्द करण्यात आल्या आहेत़अक्कलकुवा आगाराकडून अक्कलकुवा-धुळे, अक्कलकुवा-अमळनेर व अक्कलकुवा सेलंबा अशा 3 शेडय़ुलच्या 1 हजार 140 किमीच्या बसफे:या रद्द करण्यात आल्या आहेत़ त्याच प्रमाणे नंदुरबार आगाराकडून नंदुरबार-चाळीसगाव, नंदुरबार-धडगाव, नंदुरबार-औरंगाबाद, नंदुरबार-अमदाबाद, नंदुरबार-मुंबई अशा 5 शेडय़ुलच्या सुमारे 2 हजार 200 किमीच्या बसफे:या रद्द करण्यात आल्या आहेत़ पितृपक्षात प्रवाशांची संख्या घटली असल्याने राज्य परिवहन महामंडळाकडून विविध आगारप्रमुखांना कमी भारमान असलेल्या बसेस काही कालावधीसाठी बंद ठेण्याचे आदेश देण्यात आले आह़े त्यानुसार आगारप्रमुखांनी कमी भारमान असलेल्या बसेसची यादी करत पितृपक्षाच्या कालावधीर्पयत या बसेस बंद करण्याचा निर्णय घेतला आह़े लांब पल्ल्याच्या कमी भारमान असलेल्या सर्वत्र बसफे:या रद्द करणे शक्य नसल्याचे आगारप्रमुखांकडून सांगण्यात येत आह़े यामुळे प्रवाशांचीही मोठी गैरसोय होणार असल्याचे सांगण्यात येत आह़े लगAसराईनिमित्त नागरिकांकडून मोठय़ा संख्येने एसटी बसव्दारे प्रवास करण्यात येत असतो़ त्यामुळे एसटी महामंडळाच्या महसुलातही मोठी भर पडत असत़े परंतु आता पितृपक्ष असल्याने या कालावधीत कुठलेही शुभकार्य करण्याचे नागरिकांकडून टाळण्यात येत असत़े पितृपक्षाचा कालावधी म्हणजे अशुभ असल्याचा सर्वसामान्यांचा समज आह़े परिणामी या कालावधीत एसटी बसेसचेही भारमान कमी होत असत़े त्यामुळे पितृपक्षाच्या कालावधीत प्रवासी संख्या घटत असल्याने याचा विपरित परिणाम महामंडळाच्या उत्पन्नावर होत असतो़ त्यामुळे तोटय़ात बसफे:या सुरु करण्यापेक्षा एसटी महामंडळाकडून काही कालावधीपुरता लांबपल्याच्या बसफे:या रद्द करण्यात येत असतात़
पितृपक्षाचा एसटीला फटका
By संतोष.अरुण.सूर्यवंशी | Published: September 12, 2017 12:12 PM