नवापुरात निकालाच्या घोषणेनंतर ‘कही खुशी कही गम’ची अनुभूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2019 10:59 AM2019-10-25T10:59:04+5:302019-10-25T10:59:10+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नवापुर : नवापुर मतदार संघावर पुन्हा एकदा कॉग्रेसने सत्ता स्थापित केली आह़े पालिकेच्या नगरभवनात गुरुवारी झालेली ...

The feeling of 'Kahi Khushi Kahi Gum' after the announcement of the results in Navapur | नवापुरात निकालाच्या घोषणेनंतर ‘कही खुशी कही गम’ची अनुभूती

नवापुरात निकालाच्या घोषणेनंतर ‘कही खुशी कही गम’ची अनुभूती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवापुर : नवापुर मतदार संघावर पुन्हा एकदा कॉग्रेसने सत्ता स्थापित केली आह़े पालिकेच्या नगरभवनात गुरुवारी झालेली मतमोजणी कही खुशी कही गम असाच अनुभव देणारी होती़ 2 लाख 17 हजार 768 मतदारांनी आजच्या निकालावर शिक्कामोर्तब केले. सकाळी आठ वाजेपासुन चौदा टेबलांवर 24 फे:यांमध्ये मतांची मोजणी करण्यात आली. चार तासात मतमोजणी पूर्ण होऊन निकाल समोर आला़  परंतू प्रशासनाने दुपारी दोन वाजता अधिकृत निकालाची घोषणा केली़
मतमोजणीत पहिल्या फेरीपासुन कॉग्रेस उमेदवार शिरीष नाईक यांनी  आघाडी घेतली होती़ ही आघाडी शेवटच्या फेरीपयर्ंत कायम होती. मतमोजणी केंद्राच्या परिसरात पोलीसांनी कडक पहारा बसविला होता. खुद्द जिल्हा पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत मतमोजणी केंद्राबाहेर उपस्थित होते. मतमोजणीची उत्सुकता लागुन असलेले हजारो कॉग्रेस समर्थक परिसरात एकत्रित झाले होते. विसाव्या फेरीनंतर शिरीष नाईक यांची विजयाची खात्री झाल्यानंतर समर्थकांनी घोषणा देत फटाके फोडण्यास सुरुवात केली. सुमारे 11 हजाराहुन अधिक मतांनी शिरीष नाईक विजयी झाल्याचे समजल्यानंतर वरिष्ठ महाविद्यालय परिसरात कार्यकर्ते एकत्रित येऊन जल्लोष सुरु करण्यात आला़  शिरीष नाईक यांनाही मोह आवरता आला नाही व त्यांनीही ठेका धरला.  दिवंगत व प्रथम जिल्हा परिषद अध्यक्षा स्वर्गीय हेमलता वळवी यांच्या स्मारकावर पुष्पहार अर्पण करुन तेथुनच घोषणा देत विजयी रॅली काढण्यात आली. मुख्य मार्गावरुन रॅली काढून साईबाबा व गणपती मंदिरात जाऊन दर्शन घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करुन शिरीष नाईक यांनी कॉग्रेस भवनात भेट दिली. ज्येष्ठ नेते आमदार सुरुपसिंग नाईक यांचे आशिर्वाद घेत त्यांनी घेतल़े त्यांच्यासोबत अजित नाईक, पत्नी रजनी नाईक, विनोद नाईक, सुनिता नाईक, मालती नाईक, रतनजी गावीत, नरेंद्र नगराळे, रमेश गावीत आदी उपस्थित होते. दोन ठिकाणी मार्गदर्शन करतांना शिरीष नाईक यांनी मतदारांचे आभार व्यक्त करुन अडचणीच्या प्रसंगी मदत करण्याचे आश्वासन दिल़े दुसरीकडे भरत गावीत यांच्या निवासस्थानी कार्यकर्ते व सामान्य चाहत्यांनी एकच गर्दी करुन त्यांच्याविषयी आस्था व्यक्त केली. जनतेचा निकाल मान्य असून एवढ्या कमी अवधीत मोठय़ा संख्येने लोकांची मने जिंकण्यात यशस्वी झाल्याचे व त्याचे श्रेय कार्यकर्ते यांना असल्याचे भरत गावीत यांनी सांगितले.
पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांच्यासह पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तगडा पोलीस बंदोबस्त ठेवत गर्दीवर नियंत्रण ठेवले होत़े नगरभवन परिसरातील रस्त्यांवर बॅरिकेंटींग करुन वाहतूक नियंत्रण करण्यात आले होत़े यातून वाहतूक कोंडी टळली होती़ 
 

Web Title: The feeling of 'Kahi Khushi Kahi Gum' after the announcement of the results in Navapur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.