काँक्रीटीकरणाचा पहिलाच महामार्ग

By मनोज.आत्माराम.शेलार | Published: September 19, 2017 12:47 PM2017-09-19T12:47:07+5:302017-09-19T12:48:14+5:30

विसरवाडी-सेंधवा : पावसाळ्यानंतर कामाला सुरुवात, मॉडेल दर्जा देणार

The first highway of concretization | काँक्रीटीकरणाचा पहिलाच महामार्ग

काँक्रीटीकरणाचा पहिलाच महामार्ग

Next
ठळक मुद्दे टोलनाके दोन ठिकाणी या नवीन महामार्गामुळे सुरतहून इंदोर, आग्राकडे जाणारी मालवाहतूक विसरवाडीहून थेट सेंधवा येथे मुंबई-आग्रा महामार्गाला निघणार आहे. सध्या सुरतहून धुळे, शिरपूरमार्गे सेंधवा असे जावे लागते. यामुळे पावणेदोनशे किलोमिटरचा फेरा वाचणार आहे. या म तापी व गोमाईवर पूल कोळदा ते खेतिया दरम्यानच्या या टप्प्यात प्रकाशा येथे तापी नदीवर सध्या असलेल्या पुलाचा समांतर पूल बांधण्यात येणार आहे. याशिवाय प्रकाशा-डामरखेडा दरम्यान गोमाई नदीवरील सध्या असलेल्या पुलाला समांतर पूल राहणार आहे. लोणखेडा येथील गोमाई नदीव


मनोज शेलार । 
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : शेवाळी-नेत्रंगप्रमाणेच आता विसरवाडी-सेंधवा या राष्ट्रीय महामार्गास चालना मिळाली आहे. या महामार्गाचे वैशिष्ट म्हणजे तो डांबरीकरणाऐवजी संपुर्ण सिमेंट काँक्रीटीकरणात तयार होणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील किंबहुना राज्यातील हा पहिलाच काँक्रीटीकरणाचा महामार्ग राहणार आहे. महाराष्ट्र हद्दीत प्रकाशा येथे तापीवर एक आणि डामरेखडा येथे गोमाई नदीवर एक पूल प्रस्तावीत आहे. येत्या दोन वर्षात हा महामार्ग पुर्ण करण्यात येणार आहे.  
नंदुरबार जिल्हा मुख्यालयाचे शहर हे दोन राष्ट्रीय महामार्गानी जोडले जाणार आहे. त्यात शेवाळीफाटा ते गुजरातमधील नेत्रंग व विसरवाडी ते सेंधवा या महामार्गाचा समावेश आहे. पैकी विसरवाडी ते सेंधवा या महामार्गाचे काम लवकर होण्याची शक्यता आहे. याशिवाय जिल्ह्यातून या आधीच नागपूर-सुरत, ब:हाणपूर-अंकलेश्वर हे महामार्ग गेले आहेत. सोलापूर-धडगाव हा महामार्ग देखील प्रस्तावीत आहे. तर धरणगाव ते धानोरा अर्थात गुजरातहद्दर्पयतचा राज्यमार्गाचे देखील विस्तारीकरण सुरू आहे. दुर्गम व आदिवासी भाग मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रय} यातून होणार आहे.
दोन टप्प्यातील महामार्ग
विसरवाडी ते सेंधवा हा महामार्ग विसरवाडी येथून नागपूर-सुरत महामार्गापासून निघणार आहे तर सेंधवा येथे मुंबई-आग्रा महामार्गाला जोडला जाणार आहे. याची  लांबी साधारणत: 170 किलोमिटर इतकी आहे. 
राज्यातील त्याची लांबी साधारणत: 110 किलोमिटर आहे. त्यानुसार विसरवाडी ते कोळदा व कोळदा ते खेतिया अर्थात मध्यप्रदेश सिमेर्पयत असे दोन भाग या महामार्गाचे करण्यात आले आहे. या दोन्ही टप्प्यातील कामांचे वेगवेगळे भाग राहणार असून दोन्ही भागात वेगवेगळे टोलनाके देखील राहणार आहे.
पहिला टप्पा
पहिला टप्पा अर्थात विसरवाडी ते कोळदा असा असून त्या कामाची निविदा प्रक्रिया सध्या सुरू आहे. साधारणत: 300 कोटी रुपये खर्चाचा हा टप्पा राहणार आहे. या रस्त्यावर नंदुरबारच्या बाहेरून वळण रस्ता प्रस्तावीत होता. अर्थात खामगाव, बिलाडी, नळवा शिवार, वाघोदा शिवार व पातोंडा येथे हा वळण रस्ता मुख्य रस्त्याला जोडला जाणार होता. 
परंतु वळण रस्ता रद्द करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. त्यामुळे नवापूर चौफुलीवरून हा रस्ता शेवाळी-नेत्रंग या महामार्गाला जोडला जाईल. तेथून शहरातील वाघेश्वरी चौफुली व कोरीटनाका चौफुलीवरील दोन उड्डाणपुलांमार्गे कोरीट चौफुलीवरून पुढे कोळदाकडे हा रस्ता निघणार आहे

Web Title: The first highway of concretization

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.