50 लाखाच्या घरफोडीप्रकरणी चौघांना अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2019 12:53 PM2019-01-30T12:53:23+5:302019-01-30T12:53:28+5:30

शहाद्यातील घटना : मध्यप्रदेश आणि शहाद्यातून घेतले ताब्यात

Four arrested in connection with the 50-lacs burglary case | 50 लाखाच्या घरफोडीप्रकरणी चौघांना अटक

50 लाखाच्या घरफोडीप्रकरणी चौघांना अटक

Next

शहादा : शहरातील प्रशांत स्विट सेंटर येथे 2015 मध्ये झालेल्या चोरी प्रकरणी पोलिसांनी मध्यप्रदेशातून तीन तर शहाद्यातील एका व्यापा:यास अटक केली आह़े या प्रकरणात तीन संशयीतांना ऑगस्ट 2015 मध्येच अटक झाली होती़  
20 फेब्रुवारी 2015 रोजी शहरातील मुख्य रस्त्यावरील प्रशांत स्विट सेंटर या दुकानात चोरटय़ांनी भर दिवसा चोरी करुन दिड किलो सोने, दोन किलो चांदी आणि  आठ लाख रुपये रोख रक्कम असा सुमारे 50 लाख 70 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला होता़ घटना घडल्याच्या तीन महिन्यानंतर पोलीसांनी तिघा संशयितांना ताब्यात घेत त्यांच्याकडून 15 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेतला होता़ परंतू त्यानंतर  या प्रकरणाचा योग्यरित्या तपास होत नसल्याने फिर्यादीने पोलिसांविरोधात मुख्यमंत्र्यांपयर्ंत सात तक्रारी केल्या होत्या़ तक्रारींची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस महानिरीक्षक छोरींग दोरजे यांना चौकशी करण्याचे आदेश दिले होत़़े दोज्रे यांनी जिल्हा पोलिस प्रमुख संजय पाटील यांना आदेश दिल्यानंतर अप्पर पोलिस अधिक्षक चंद्रकांत गवळी यांची विशेष तपास अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती़ याप्रकरणी चार महिन्यापासून तपास सुरु होता़ 
पोलीसांकडून ऑगस्ट 2015 मध्ये गुन्ह्यातील संशयित असलेल्या ईश्वर उर्फ नागेश उत्तम ठाकरे रा़ सालदारनगर, पिन्या उर्फ संदीप चंद्रसिंग पवार रा़ डोंगरगाव रोड व लिंबा नथ्थू गुरव रा़ वृंदावननगर  या तिघांना अटक करण्यात आली होती़ चौकशीदरम्यान तिघांनी सोने व दोन किलो चांदी, मोटार सायकल, फ्रिज असा 15 लाख 37 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता़ 
आधी अटक केलेल्या संशयितांचे जाबजबाब, दागिने कोणाला विकले, कोणाकडून हस्तगत केले याची माहिती जाणून घेतल्यानंतर उर्वरित चौघांना ताब्यात घेण्याची कारवाई पूर्ण करण्यात आली़ सोमवारी सायंकाळी सात वाजेच्या सुमारास पानसेमल जि़ बडवानी येथून लिलाधर मोहनलाल सोनी, प्रकाश हिरालाल सोनी व कमलेश धन्नालाल जैन तर शहादा शहरातून सुमित सोनी या चौघांना ताब्यात घेण्यात आल़े या चोरीतील 28 लाख 70 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल अद्याप जप्त करणे बाकी असून कारवाईची प्रतिक्षा आह़े 
 

Web Title: Four arrested in connection with the 50-lacs burglary case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.