पोलिसांसमोरच रंगली युवकांमध्ये फ्रीस्टाईल, एकमेकांकडे पाहण्याचा वाद, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:35 AM2021-09-14T04:35:32+5:302021-09-14T04:35:32+5:30

नंदुरबार : एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून पोलिसांसमोरच दोन युवकांमध्ये फ्रीस्टाईल रंगल्याची घटना नंदुरबारमधील काॅलेज रोडवर घडली. याप्रकरणी पोलिसांच्या फिर्यादीवरून दोन ...

Freestyle among the colorful youths in front of the police, an argument over looking at each other, filing a case against both of them | पोलिसांसमोरच रंगली युवकांमध्ये फ्रीस्टाईल, एकमेकांकडे पाहण्याचा वाद, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

पोलिसांसमोरच रंगली युवकांमध्ये फ्रीस्टाईल, एकमेकांकडे पाहण्याचा वाद, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल

Next

नंदुरबार : एकमेकांकडे पाहण्याच्या वादातून पोलिसांसमोरच दोन युवकांमध्ये फ्रीस्टाईल रंगल्याची घटना नंदुरबारमधील काॅलेज रोडवर घडली. याप्रकरणी पोलिसांच्या फिर्यादीवरून दोन युवकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबारमधील रायसिंगपुरा ते जीटीपी कॉलेज रोडवर ही घटना घडली. शुभम अरुण गायकवाड (रा. रायसिंगपुरा) व जय संजय वळवी (रा. जीटीपी झोपडपट्टी) यांच्यात आधीपासूनच वाद होता. त्यातच ११ रोजी दुपारी त्यांनी एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून वाद घातला. या वादाचे पर्यावसान मारहाणीत झाले. आधीच या भागात गणेशोत्सवामुळे पोलीस बंदोबस्त तैनात आहे. असे असताना पोलिसांसमोरच गायकवाड व वळवी यांची फ्रीस्टाईल रंगली. पोलिसांनी त्याठिकाणी येत दोघांनाही वेगळे केले. त्यानंतर पोलीस कर्मचारी सोन्या पटले यांनी फिर्याद दिल्याने शुभम गायकवाड व जय वळवी यांच्याविरुद्ध शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अधिक तपास जमादार जितेंद्र जाधव करत आहेत.

दरम्यान, या रस्त्यावर टारगट युवकांची नेहमीच गर्दी असते. वेगाने दुचाकी चालवणे, मुलींना पाहून शेरेबाजी करणे असे प्रकार या रस्त्यावर चालतात. महाविद्यालयाकडे तसेच आयटीआयकडे जाणारा हा प्रमुख रस्ता आहे. त्यामुळे पोलिसांनी या रस्त्यावर गस्त वाढवावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

Web Title: Freestyle among the colorful youths in front of the police, an argument over looking at each other, filing a case against both of them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.