लोकमत न्यूज नेटवर्कतळोदा : सध्या मुबलक प्रमाणात पाणी असले तरी भविष्यात पाण्याचे दुर्भिष्य जाणवणार आहे. त्यामुळे आतापासूनच पाण्याचे व्यवस्थापन करा. यासाठी गट बनवून त्यात अनुभवी व्यक्तींसोबत महिला, तरूणींचा समावेश करून गावा-गावात जलव्यवस्थापनाबाबत जनजागृती व्हावी अशी अपेक्षा जलतज्ज्ञ डॉ.राजेंद्रसिंह यांनी व्यक्त केली़तळोदा तालुक्यातील कालीबेल येथे लोकसंघर्ष मोर्चाच्या वतीने पाणी परिषद घेण्यात आली. त्या वेळी ते बोलत होते. या वेळी यशदाचे समन्वयक डॉ.सुमंत पाडे, लोकसंघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे, तहसीलदार योगेश चंद्रे, तालुका कृषी अधिकारी प्रविण भोर, प्रा.जयपाल शिंदे, सरपंच मान्याभाऊ पावरा, नाटय़ाभाऊ पावरा आदी उपस्थित होते. डॉ.सिंह गावक:यांना मार्गदर्शन करताना पुढे म्हणाले की, सद्या मोठय़ा प्रमाणात दुष्काळी परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. वाळवंटा पेक्षा इकडे ब:याच प्रमाणात मुबलक पाणी आहे. मात्र भविष्यात पाण्याचे दुर्भिष्य जानवण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावक:यांनी आतापासूनच गावाचे, परिसराचे जलव्यवस्थापन केले पाहिजे. त्यासाठी उस, केळी सारखी पाण्याची पिके घेऊ नका. कमी पाण्यात येणारी पिके घ्या. शिवाय गावा-गावात ग्रामस्थांमध्ये जलव्यवस्थापनाबाबत जनजागृती करा. याकरीता गट बनवून त्यात अनुभवी व्यक्ती, महिला व तरूणांना सहभागी करून जलव्यवस्थापन करणा:या आदर्श गावांना भेटी द्या, असेही त्यांनी सांगितल़े या वेळी त्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील मेंढालेखा या आदिवासी गावाचे उदाहरण दिले. या गावात फक्त 75 कुटुंबे राहतात. त्यांनी पाण्याचे उत्तम व्यवस्थापन केल़े शासनाने त्यांना 1200 हेक्टर जमीन देवून बांबूची लागवड केली. त्यामुळे त्यांना शासनाचा प्रचंड निधी मिळून गावाचा विकास साधला आहे. आपणही या गावाचा आदर्श घेत प्रत्येकाने जल व्यवस्थापन केल्यास पाण्याचे दुर्भिष्य जाणवणार नसल्याचेही ते म्हणाल़े या वेळी यशदाचे डॉ.पांडे, प्रतिभा शिंदे, तहसीलदार चंद्रे यांनीही मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचानल निशांत मगरे तर आभार दिलवरसिंग वळवी यांनी मानले. कार्यक्रमास कालीबेल गावातील ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
भविष्यात पाण्याचे दुर्भिष्य जाणवणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 10:58 AM
डॉ़ राजेंद्रसिह : जलव्यवस्थापनाबाबत गावो-गावी जनजागृती आवश्यक
ठळक मुद्देनंदुरबार, यवतमाळ जिल्हे प्रायोगिक तत्वावर जल व्यवस्थापनाच्या संदर्भात राज्यातील नंदुरबार व यवतमाळ हे दोन जिल्हे शासनाने प्रायोगिक तत्वावर घेतले आहे. या जिल्ह्यामध्ये जलसंधारणाची कामे सुरू झालेली आहेत. यासाठी गावक:यांनी जल व्यवस्थापनाच्या सुक्ष्म आराखडा त