‘श्रीं’च्या आगमनासाठी गणेशभक्त सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2017 11:54 AM2017-08-20T11:54:54+5:302017-08-20T11:55:10+5:30
साज-सजावट साहित्यांच्या खरेदीची लगबग : मंडळांची तयारीही अंतीम टप्प्यात
लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असल्याने आपल्या लाडक्या ‘श्री’च्या आगमनासाठी व त्याचे स्वागत करण्यासाठी गणेशभक्तदेखील सज्ज झाले आह़े नंदुरबार शहरात साज-सजावट साहित्ये खरेदी करण्यासाठी भाविकांची लगबग सुरु झाली आह़े
25 रोजी श्रीगणेश चतुर्थी आहे यानिमित्त शहरातील विविध गणेश मंडळांसह घरगुती गणपतींचीदेखील प्रतिष्ठापना होणार आह़े त्यासाठी गणेशभक्त बाजारपेठेत उपलब्ध असलेले विविध साज सजावटीचे साहित्यांची खरेदी करण्यासाठी गर्दी करीत आहेत़
दरम्यान ‘श्रीं’च्या आगमनासाठी नंदुरबार शहर उजळून निघाले आह़े गणेश मुर्ती तसेच आकर्षक विद्युतरोषणाईमुळे शहरातील मुख्य चौक परिसरात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आह़े तसेच ग्रामीण भागातील कार्यकत्र्यानी आतापासूनच आपल्या लाडक्या गणरायाला गावी नेण्याने नियोजन केले आह़े
शहरात सार्वजनिक गणेश मंडळांची नोंदणी सुरु असली तरी बहुतेक गणेश मंडळांनी आकर्षक सभामंडपांची तयारी तसेच विविध प्रकारच्या सामाजीक संदेश देणा:या आरास उभारणीची तयारी केली आह़े सार्वजनिक मंडळांप्रमाणेच घरगुती गणेशमुर्तीदेखील आरक्षित करण्यात आल्या आहेत़ घरोघरांमध्ये स्थापना करण्यात येणा:या गणेशमुर्तीची दुकाने मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा उपलब्ध आहेत़
त्यासोबतच दूर्वा, बत्तासे, प्लॅस्टिकच्या फुलमाळा, विद्युत रोषणाईची साहित्ये तसेच गणरायासाठी वापरण्यात येणारे थर्माकॉलचे सिंहासने, मुकूट, झुमर यासह इतरही सजावटीचे साहित्ये बाजारपेठेत विक्रीसाठी आणले जात आहेत़
घरांमध्ये विराजमान होणा:या गणरायांचे स्वागत करण्यासाठी विशेषकरुन तरुणाईमध्ये उत्साह दिसून येत आह़े बाजारपेठेत सजावटीचे कुठले नवीन साहित्य आले आहे याची चाचपणीदेखील त्यांच्याकडून करण्यात येत आह़े