गौरींचे आगमन; तीन दिवस मुक्काम माहेरी.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:35 AM2021-09-14T04:35:41+5:302021-09-14T04:35:41+5:30
प्रकाशा : भाद्रपद महिन्यात गौरी सुद्धा गणपतीसोबत तीन दिवस माहेरी येतात. म्हणून प्रकाशा येथे गौरींची सजावट करून ...
प्रकाशा : भाद्रपद महिन्यात गौरी सुद्धा गणपतीसोबत तीन दिवस माहेरी येतात. म्हणून प्रकाशा येथे गौरींची सजावट करून यथोचित पूजा करण्यात येत आहे. सोमवारी गौरीला नैवेद्य दाखवून उत्सव साजरा करण्यात आला.
पहिल्या दिवशी उत्साहाच्या वातावरणामध्ये त्यांचे आगमन झाले. प्रकाशा येथील पंकज ठाकणे यांचा परिवार गेल्या अनेक वर्षांपासून हा उत्सव साजरा करतो. यावर्षीही छोटेखानी घरगुती कार्यक्रम साजरा करण्याचे त्यांनी ठरवले आणि पहिल्या दिवशी गौरींचे आगमन झाल्यावर परिसरातील महिलांनी पूजाअर्चा केली. दुसऱ्या दिवशी गौरी जेवण करतात, अशी अख्यायिका आहे. यावेळी गौरीला विविध पदार्थांचा नैवेद्य दाखविला जातो. तसेच सुहासिनी श्रद्धेने तिची खणा-नारळाने ओटी भरतात. धार्मिक गाणी म्हणत दुसरा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात साजरा केला. मंगळवारी म्हणजे तिसऱ्या दिवशी गणपती व गौरी यांचे विसर्जन होणार आहे.
यावेळी गौरीची उत्तर पूजा करून त्यांचे मुखवटे वर्षभर आपल्या देवघरात पूजेसाठी ठेवले जातात व गणपतीचे पाण्यात विसर्जन केले जाणार आहे.