नंदुरबार : मंदीरात दर्शनासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेवून चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील २८ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लंपास केल्याची घटना घडली. याबाबत म्हसावद पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.महाराष्टÑ-मध्यप्रदेशच्या सिमेवर रायखेड गावानजीक कोचरा मातेचे मंदीर आहे. या ठिकाणी जाऊळ काढणे व इतर धार्मिक विधीसाठी भाविकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते. याच गर्दीचा फायदा घेवून चोरटे आपली हातसफाई करीत आहे. १२ फेब्रुवारी रोजी दुपारच्या वेळी गर्दीत दर्शनासाठी गेलेल्या डॉ.सोनल शिरीष भावसार, रा.ब्रम्हसृष्टी कॉलनी, शहादा यांच्या गळ्यातून चोरट्यांनी १४ ग्रॅम जवनाची व २८ हजार रुपये किंमतीची सोन्याची पोत लंपास केली. महिलेच्या लक्षात ही बाब आल्यावर शोधाशोध झाली, परंतु उपयोग झाला नाही.याबाबत डॉ.सोनल भावसार यांनी फिर्याद दिल्याने म्हसावद पोलिसात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार बिºहाडे करीत आहे.दरम्यान, मंदीर परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना कराव्या अशी मागणी भाविकांकडून होत आहे. अशा प्रकारे चोरीच्या घटना यापूर्वी देखील झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे किंवा तात्पुरती सुरक्षा व्यवस्था उभारावी अशी अपेक्षा भाविकांमधून व्यक्त होत आहे.
खेड कोचरा येथे मंदीरात दर्शनासाठी गेलेल्या महिलेची सोन्याची पोत लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2019 11:42 AM